स्किलबुक एप
प्रकल्पाचा देशार्पण सोहळा संपन्न
नवी
दिल्ली, 9 डिसेंबर : स्किलबुक एप हे ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा
संगम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी
केले.
नवीन महाराष्ट्र सदन येथे आज स्किलबुक एप चा देशार्पण
सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे शिल्पनिदेशक ( कोपा) या
पदावर कार्यरत असलेले डॉ. किरण प्रकाश झरकर यांनी तयार केलेल्या स्किलबुक एप च्या देशार्पण
समारंभ कार्यक्रमात जगन्नाथ पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्लानंद
सरस्वती यांच्यासह भारतातील विविध पंथांचे गुरू उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील
विविध ह.भ.प. प्रमुख मंचावर उपस्थित होती.
श्री मुळे म्हणाले, स्किलबुक एप हा विद्यार्थ्यांपासून
ते शेतक-यांपर्यंत प्रत्येकाला उपयोगी पडणारे महत्वाचे एप आहे. हा उपक्रम फेसबुक समाज
माध्यमांपेक्षा चारपट मोठा उपक्रम आहे. याचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा आणि
इतरांनाही करून दयावा, असे आवाहनही श्री मुळे यांनी यावेळी केले.
श्री. झरकर यांनी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्किल बुक या संगणकीय प्रणालीची निर्मिती केली आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी
बदल करणारे स्किलबुक हे उपकरण विद्यार्थ्यांना व शेतक-यांना उपलब्ध करून
देण्यासाठी मुळे आण्णा सोशल फाउंडेशन, औरंगाबाद या संस्थेच्या मदतीने स्किलबुक हे
आंतरराष्ट्रीय दर्जाचे एप तयार करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या स्किल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेला बळ देण्यासाठी डॉ. झरकर यांनी
गेल्या चार वर्षापासून स्किल बुक या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीवर संशोधन केले
आहे.
स्किल बुक हे एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक
लाख कौशल्यांशी जोडण्याचे डिजिटल माध्यम आहे. मोबाईल एप्लिकेशन,
संगणक
वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे.
स्किल बुक या एप प्रणालीतून मुख्यत्वे विद्यार्थी व शेतकरी यांचे एक लाख कौशल्याचे
जाळे तयार करण्यात येणार आहेत. यात कौशल्य प्रकाशन, प्रशिक्षण,
अभ्यासक्रम,
प्रमाणपत्र,
नोकरी,
शिकाऊ
उमेदवारी, सेवा व स्टार्टअप या सुविधा सर्वांना
उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
स्किल बुक या प्रकल्पास स्मित किरण पब्लिशिंग प्रा. ली.
या कंपनीने स्टार्टअप इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत तयार केलेले आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्यावतीने कंपनीस डिप प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले
आहे.
यावेळी कार्यक्रमास स्किल बुकच्या संचालिका, प्राचार्य डॉ. भारती
पाटील, तसेच विशेष निमंत्रीत करण्यात आलेले माहिती जनसंपर्क विभागाचे माजी संचालक
तथा न्यूज स्टोरी टूडे या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ आणि जेष्ठ दूध तज्ञ्ज अशोक कुंदप हे ही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment