नवी दिल्ली , 27 : साहित्याच्या
माध्यमातून समाजात वैज्ञानिक विचार रूजविता येतो, असे प्रतिपादन दै. हितवादचे दिल्लीतील
विशेष प्रतिनिधी राजीव शर्मा यांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात आज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उपाख्य
कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने साजरा होणा-या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले
होते. त्यावेळी ते बोलत होते. श्री शर्मा
यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी
आणि कर्मचा-यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. परिचय केंद्राच्या माहिती
अधिकारी अंजू निमसरकर यांनी राजीव शर्मा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत
केले.
श्री
शर्मा पुढे म्हणाले, वैज्ञानिक विचारानुसार
वागावे असे आपल्या राज्यघटनेतही अंर्तभूत आहे. त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी
साहित्य हे एक चांगले माध्यम आहे. साहित्य हे दूधारी तलवारासारखे असते. जेवढा
चांगला परिणाम जनमानसावर साहित्यातून होऊ शकाते तेवढाच नकारात्मक परिणाम देखील होत
असतो, असे श्री शर्मा यावेळी म्हणाले.
श्री शर्मा त्यांनी कुसूमाग्रजांची सुप्रसिद्ध कविता
‘पृथ्वीचे प्रेमगीत’ याचे अभिवाचन करत ही कविता जवेढी मानवी भावनांना
व्यक्त करणारी आहे तेवढीच विज्ञानाच्या जवळ असणारी देखील असल्याचे संदर्भासहीत
सांगितले. श्री शर्मा म्हणाले, आपण जगत असतांना आपल्याला जगण्यातून आलेले ज्ञान हे
विज्ञानातून येत असते. पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत कवीने प्रेम, विरह या मानवी
भावनांची सूंदर, अंत्यत सोप्या शब्दात मांडणी केलेली आहे. ही कविता अनेक वैज्ञानिक
सिद्धांत आणि त्तत्थांचा वापर करीत त्याला कुठेही छेद न देत लिहीलेली असल्याचे
त्यांनी सांगितले. ही कविता वाचल्यावर लक्षात येत की जीवनातील छोटया-छोटया गोष्टीं
विज्ञानाशी निगडीत आहे. विज्ञान म्हणजे आपल्या सभोवतालची सृष्टी, निर्सग, पर्यावरण
आहे. विज्ञान आपल्याला मदत करते आपले पर्यावरण जाणून घेण्यासाठी तसेच जीवन
व्यवस्थीत जगण्यासाठी असहे श्री शर्मा यांनी सांगितले.
महाराष्ट्र परिचय केंद्राने वि.वा.शिरवाडकरांच्या
साहित्य वाचनाचा उपक्रम १४ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान हाती घेतला होता. या उपक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर
मुळे, तामिळनाडूच्या राज्यपालांचे प्रधान सचिव, श्री.आनंदराव वि. पाटील, महाराष्ट्र सदनचे(दिल्ली)निवासी
आयुक्त तथा प्रधान सचिव श्री समीर कुमार बिस्वास ,महाराष्ट्र सदनाच्या (दिल्ली)
अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत
व्यापार प्रोत्साहन विभागाच्या संचालक सुप्रिया देवस्थळी – कोलते, भारत सरकारच्या
रजिस्ट्रार जनरल कार्यालयात सहसंचालक, श्रीमती वृषाली वराडे,
भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या उपमहासंचालक
श्रीमती अनुजा बापट, ज्येष्ठ पत्रकार श्री
अनंत बागाईतकर, दै.सकाळचे (दिल्ली) वरिष्ठ
प्रतिनिधी श्री.मंगेश वैशंपायन, दै.केसरीचे दिल्ली विशेष प्रतिनिधी, श्री कमलेश गायकवाड, पीटीआय वृत्तसंस्थेचे(दिल्ली) सहायक संपादक श्री.
सागर-कुलकर्णी, , दै.पुढारीचे दिल्ली प्रतिनिधी, श्री.सुमेध
बनसोड, बीबीसी मराठीचे दिल्ली प्रतिनिधी, श्री गणेश पोळ, केंद्र
शासनाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर मध्ये,मॉनिटर
श्री प्रसाद माळी हे या उपक्रमात सहभागी झाले होते.
वि.वा.शिरवाडकरांच्या कथा,
कादंबरी,कविता आदि साहित्याचे मान्यवरांनी केलेले वाचन परिचय केंद्राच्या तीन्ही
ट्वीटर हँडल,तीन्ही फेसबुक पेज,युटयूब चॅनेल, इन्स्टाग्राम आणि कु या समाजमाध्यमांवर संबंधित ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. त्याला नेटकर-यांनी
भरभरून प्रतिसाद दिलेला आहे.
00000
आम्हाला
ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजू निमसरकर/वि.वृ.क्र. 40/ दि.27.02.2022
No comments:
Post a Comment