Thursday, 26 May 2022

महाराष्ट्रातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी 20 जूनला निवडणूक

 






नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या  10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंत‍िम दिनांक 9 जून आहे.

महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेतून 06.07.2022 ते 21.07.2022 या कालावधी  दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे 10 सदस्य तसेच  उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या एकूण  20 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. या रिक्त होणा-या जागांसाठी येणा-या‍ 10 जून रोजी निवडणूक होणार आहे.

            महाराष्ट्रातून सदाशिव खोत, सुजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 7 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे तर, रामनिवास सिंह यांचा कार्यकाळ 2 जानेवारी 2022 रोजी संपूष्टात आलेला आहे. सदरील जागांसाठी विधानसभेच्या सदस्यांकडून विधानपरिषदेवर निवड केली जाणार आहे.

 

निवडणूक कार्यक्रम

विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी आयोगाकडून अधिसूचना दि. 2 जून, 2022 रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख 9 जून, 2022 पर्यंतची आहे. अर्जांची छाननी 10 जून, 2022 रोजी होणार असून, 13 जून, 2022 पर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 20 जून 2022 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत होणाार असून, त्याचदिवशी सायंकाळी 5.00 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

आयोगाने कोविड 19 बाबत जाहीर केलेल्या विस्तृत मार्गदर्शक सूचना पुढील लिंक वर उलब्ध आहेत. https://eci.gov.in/files/file/14151-schedule-for-bye-election-in-3-assembly-constituencies-of-odisha-kerala-and-uttarakhand%E2%80%93-reg/

संबंधित राज्यांच्या मुख्‍य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी संबंधित अधिका-यांना  सर्व आवश्‍यक त्या उपाय योजना करण्‍याविषयी निर्देश आयोगाकडून दिले गेलेले आहेत.

निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे किंवा कसे़ याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

 अंजुनिमसरकर/वि.वृ.क्र. 79  /दि. 26.05.2022

Friday, 20 May 2022

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन




 


नवी दिल्ली दि. २० : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी' दिन  पाळण्यात आला .

               कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निरूपमा डांगे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली.

                महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी' दिनाचे आयोजन

            महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर ,उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

                                                                          0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

 वि.वृ.क्र. 78  /दि. 20.05.2022

 

 

Thursday, 19 May 2022

मुंबई के इंदू मिल में बन रहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रतिमा का काम समयपर पुरा करे : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे






मंत्रिमंडल की उपसमिती की समीक्षा बैठक में दिए निर्देश

 

नवी दिल्ली, 19 : मुंबई के प्रतिष्ठ‍ित इंदू मिल परिसर में  बन रहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  की  350 फीट उँची प्रतिमा का काम समय पर पुरा करने के निर्देश, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  ने दियें |  राम सुतार आर्ट कंपनी में डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 25 फीट उँची प्रतिरूप प्रतिमा का मुआयना करने के बाद, संबधित आधिकारों को निर्देश दिए.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक के  नियुक्त मंत्रिमंडल की उपसमिती की समीक्षा बैठक गाजियाबाद (उत्तर प्रदेश ) के राम सुतार की आर्ट कंपनी में हुई  | इस उपसमिती के अध्यक्ष सामाजिक न्याय एंव विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे एवं समिती की सदस्या स्कुली शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड  ने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 25 फीट  प्रतिरूप प्रतिमा का जायजा लेकर इसमें कुछ सुझाँव दिए | इन सुझाँवों को जल्द पुरा कर मुल 350 फीट प्रतिमा को मार्च 2024 से पहले पूरा करने के निर्देश दोनों मंत्रियों ने दिए |

अंतरराष्ट्रीय दर्जे के इस  भव्य स्मारक में  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  की  350 फीट उँची प्रतिमा बनाई जाएगी | जिसका काम प्रख्यात शिल्पकार पद्यभूषण श्री राम सुतार कर रहे हैं | इस प्रतिमा की प्रतिरूप  25 फीट  बनाई गयी है | इस प्रतिरूप प्रतिमा के आधारपर मूल प्रतिमा बनेगी | आज हुई इस समीक्षा बैठक में दोनों मंत्रियों के ओर  से किए गये सुझावों को राम सुतार तथा उनके  पुत्र अनिल सुतार सहित अन्य संबंधित अधिकारों को दिये  | साथ ही श्री मुंडे तथा श्रीमती गायकवाड  ने उपस्थित मुद्दोपर अधिकारियों ने उनका समाधान किया |

मुंबई का उमसभरा हवामान, समुद्री हवायें, समुद्री तूफार, हवा की गति तथा दिशा जैसे अनेक विषयोंपर भी विस्तृत चर्चा हुयी. इसी के साथ प्रतिमा की संरचनात्मक स्थिरता का भी विषय लिया गया.

इस बैठक में सामाजिक न्याय विभाग के सचिव सुमंत भांगे, विभाग के आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगले,   मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)  के मुख्य अभियंता  प्रकाश भांगरे, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्ट के अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, शापुरजी पालनजी कंपनी के परियोजना प्रबंधक उमेश सालुंखे, शशी प्रभु अँड असोसिएट के परियोजना सलाहकार अतुल कविटकर आदि उपस्थित थे.

 

      


इंदू मिल येथील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करा -सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे












 

   गाझियाबाद येथे  झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आढावा बैठकीत दिले निर्देश          

 

नवी दिल्ली, १९ : मुंबई येथील इंदू मिल मध्ये उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळा निर्माणाचे कार्य वेळेत पूर्ण  करण्याचे निर्देश आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

             भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी  नियुक्त  मंत्रिमंडळ  उपसमितीची आढावा बैठक  गाझियाबाद(उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी  येथे आज आयोजित करण्यात आली. समितीचे अध्यक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  धनंजय मुंडे आणि समितीच्या सदस्य शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी गाझियाबाद येथे सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची  पाहणी  करून  बैठकीत  आवश्यक सूचना केल्या.

          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फुट उंच पुतळा  उभारण्यात येणार आहे. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येत असल्याने मंत्रिमंडळ उपसमितीने आज या प्रतीकृतीची पाहणी केली. उभय मंत्री महोदयांनी यावेळी पाहणीनंतर राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना प्रतीकृतीतील आवश्यक रेखीव बाबींविषयी काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार एमएमआरडीए,जे.जे स्कुल ऑफ आर्ट,आय.आय.टी.बॉम्बेची तज्ज्ञ मंडळी आणि स्मारक सल्लागारांच्या मार्गदर्शनाधारे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीत आवश्यक बदल करून मूळ पुतळयाच्या कामाला सुरुवात करावी असे निर्देश श्री. मुंडे यांनी बैठकीत दिले. तसेच, यासाठी राज्यशासनाच्यावतीने आवश्यक  ती सर्व प्रकारची मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री द्व्यांनी यावेळी  सांगितले.

         यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमीत भांगे, विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंते  प्रकाश भांगरे, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे, शापुरजी पालनजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश साळुंखे, शशी प्रभु अँड असोशिएट्सचे प्रकल्प सल्लागार अतुल कविटकर आदि यावेळी उपस्थित होते.

             श्री. मुंडे यांनी सांगितले की इंदू मिल येथे  नियोजित डॉ .बाबासाहेब आंबेडकर  स्मारकाच्या सुधारित संकल्पनेस  जानेवारी २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  यानुसार स्मारकातील पुतळयाची उंची वाढवून ३५० फूट करण्यात आली.  पुतळा उभारण्यासाठी चवथरा निर्माणाचे कार्य सुरु असून याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गाझियाबाद येथील राम सुतार कंपनीत पुतळयाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यात आजच्या आढावा  बैठकीत काही बदल सुचविण्यात आले आहेत. बदलाअंती उपसमितीच्या मंजुरीनंतर मूळ पुतळा निर्माण कार्यास सुरुवात होणार आहे. मार्च २०२४  पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे राज्यशासनाने उद्ष्टि आहे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुंडे यांनी अधोरेखित केले.

         प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्यशासनाने ११०० कोटींच्या सुधारीत निधीस मंजुरी दिली आहे. राज्यशासनाने मार्च २०२२ अखेर २२८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असून यातील यापैकी २८ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी ३०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

         इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे  भव्य स्मारक उभारण्यास राज्यशासन कटीबध्द असून बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट आहे. देश- विदेशातील बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळयापासून प्रेरणा घेतील, असा विश्वासही उभय मंत्रिमहोदयांनी यावेळी व्यक्त केला.  

                                                                           0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

 रितेश भुयार/ वि.वृ.क्र. 7 /दि.1.05.2022

 

 


Tuesday, 17 May 2022

औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे-उद्योग मंत्री सुभाष देसाई






                  नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना दिले निवेदन  

नवी दिल्ली, १७ : मराठवाडयातील पर्यटन व औद्योगिकदृष्टया महत्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अशी मागणी उद्योग तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना आज येथे केली.

            राजीव गांधी भवन, या नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये आज श्री. देसाई यांनी श्री. सिंधिया यांची भेट घेतली. औरंगाबाद  विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करणे, विमानाच्या  फेऱ्या वाढविणे आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या बाबतचे निवेदनेही श्री. देसाई यांनी दिले. यावेळी  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते.

                                          विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार व्हावा

            यावेळी झालेल्या चर्चेत श्री. देसाई यांनी सांगितले की, मराठवाडयात अजिंठा -वेरुळ लेण्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना जपान, कोरिया,अमेरिका आदि देशांतून व  वेगवेगळया राज्यांतून तसेच महाराष्ट्रातून मोठया संख्येने पर्यटक भेटी देतात. पर्यटक व प्रवशांचा वाढता ओघ पाहता औरंगाबाद विमानतळाची  सद्याची  धावपट्टी लहान पडत असून या धावपट्टीच्या विस्ताराची गरज असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी अधोरेखित केले. या कामी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जमीन अधिग्रहण करण्यात येईल तसेच पुढील  प्रक्रियेसाठी  नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा विषय गतीने पुढे न्यावा व औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावे, अशी विनंतीही श्री. देसाई यांनी केली. राज्यशासनाने जमीन अधिग्रहण करून दिल्यास  विमानतळ धावपट्टीचा विषय तत्परतेने पुढे घेवून जावू,असे आश्वासन यावेळी श्री. सिंधिया यांनी दिले.

      

                                          विमान फेऱ्या वाढविण्यात याव्यात

       पर्यटक व प्रवाशांची वाढती संख्या पाहता औरंगाबाद विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही श्री. देसाई यांनी यावेळी केली. मुख्यत्वे मुंबई-औरंगाबाद शहरांदरम्यान दररोज सकाळी नियमित विमान फेरी सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सद्या उभय शहरांमध्ये सायंकाळी विमान फेरी  सुरु आहे.तथापि,पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची वाढती गर्दी व मागणी पाहता तातडीने सकाळच्या विमान फेऱ्या सुरु होण्याची आवश्यकता असल्याचे श्री. देसाई यांनी नमूद केले. याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन श्री. सिंधिया यांनी दिले.    

                      छत्रपती संभाजी महाराज विमानतळनामकरणास केंद्राने मंजुरी द्यावी 

              मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी राज्यशासना हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या प्रस्तावास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी मागणी श्री. देसाई यांनी यावेळी केली. महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यातून विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव मंत्रालयाकडे आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीने हा विषय मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन श्री. सिंधिया यांनी यावेळी दिले.  

            औरंगाबाद विमानतळावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उाभारण्याची मागणीही श्री. देसाई यांनी यावेळी केली यास श्री. सिंधिया यांनी सकारात्मकता दर्शविली. श्री. देसाई यांनी श्री. सिंधिया यांना यावेळी, मराठवाडयाची प्रसिध्द शाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एरियल फोटोग्राफीवर आधारित महाराष्ट्र देशा हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. 

                                                           0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

 रितेश भुयार/ वि.वृ.क्र. 76 /दि.17.05.2022

 

 

 

Elevate Aurangabad Airport to an International Airport : Urges Industries Minister, Subhash Desai ToUnion Civil Aviation Minister

 




 

New Delhi, 17: “Aurangabad is the tourism capital of Maharashtra.National and international tourists in large numbers visit the World heritageand historical sites. Being an important industrial hub as well, the Aurangabad Airport be elevated to an international airport along withits runway expansion, urged the Industries and Guardian Minister of Aurangabad, Shri Subhash Desai in a meeting with the Union Civil Aviation Minister, Shri JyotiradityaScindia, here today.

            The meeting was held at Rajiv Gandhi Bhavan. Shri Desai urged for Government of India permission and sanction for various issues concerning Aurangabad Airport. Issues like renaming of Aurangabad airport in the name of Maratha Warrior King, ChhatrapatiSambhajiMaharaj, airport expansion, increase in the frequency of flights and erecting a full size Statue of ChhatrapatiSambhajiMaharajat the airport were discussed at length.To which, the Civil Aviation Minister gave an affirmative assurance. Union Finance Minister of State, Dr Bhagwat Karadwas also present.

The Minister deliberated on the issue of Airport expansion. He said, Runway at the Aurangabad Airport needs to be expanded owing to the increase in Air Traffic and future air travel requirements of Aurangabad. Once, if the GoI gives a nod to this expansion, the Airport will be elevated as an international airport. He further informed the Union Minister about the Aurangabad airport becoming the part of the city due to rapid urbanization and acquisition of 182 acre land is needed for the proposed expansion. Informing further, Shri Desai assured of seeking land acquisition from the local administration speedily.  And once this issue is sorted from the State front, expedition from GoI will be needed immediately, he urged. This will facilitate international flights as tourists from countries like Japan, Korea, and United States visit Aurangabad in large numbers, he added.

Deliberating on the issues, Shri Desai sought for the change in name of the present Aurangabad Airport to ‘ChhatrapatiSambhajiMaharaj’ Airport. The contribution of ChhatrapatiSambhajiMaharaj to the Maratha Empire has been immense and he is an iconic figure in Maharashtra’s rich and vibrant history, Shri Desai added. He further said, a resolution to recommend changing the name of the Aurangabad Airport to ChhatrapatiSambhajiMaharaj Airport has been approved by the State Cabinet under the able Chairmanship of the Chief Minister, Shri Uddhav Thackeray. Thereafter it has been unanimously passed in March 2020 by both the houses of the Maharashtra State Legislature. The Same resolution has already been forwarded to the Ministry of Civil Aviation Ministry. Responding to this, Shri Scindia informed, GoI has received representation for renaming of various airports across 13 States.  The review for these representations is under the purview of the Prime Minister Shri Narendra Modi and the Union Cabinet. Once a decision on this issue is taken up, the issue for renaming the Aurangabad airport will be cleared.

The Industries Minister took up the issue of increasing the frequency of flights between towards Aurangabad. However, on priority basis, flights between Mumbai and Aurangabad be increased at the earliest, he requested. Adding further, the frequency of flight from Mumbai to Aurangabad (Sambhajinagar) as International Tourist Destination and Industrial Hub of Marathwada region is only in the evening, which should be increased in the morning as well, he urged. The frequency of flightswill be able tocarry sufficient passenger load to meet the requirements, to which the union minister replied in positive.