Friday, 8 July 2022

मुख्यमंत्र्यांचे महापुरुषांना अभिवादन





मुख्यमंत्र्यांचे  महापुरुषांना अभिवादन

 

नवी दिल्ली ९ : मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांनी आज  महाराष्ट्र सदनाच्या परिसरात स्थित महापुरुषांच्या पुतळयांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

        मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या  दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या  दर्शनीभागात स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ, राजेश अडपावार यावेळी उपस्थित होते.

           सदनातील मुख्यमंत्री दालनाच्या शेजारी स्थित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच राज्यपालांच्या दालनाशेजारी स्थित थोर समाजसुधारक महात्मा  फुले यांच्या पुतळ्यासही मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

                                         00000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार/वि.वृ.क्र.99/दि.09.07.2022


 

No comments:

Post a Comment