Friday, 12 August 2022

ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांची परिचय केंद्राला भेट

 



नवी दिल्ली,  दि.12 : गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

            गोव्यामधील  इन गोवा या 24 तास चालणा-या मराठी आणि इंग्रजी वाहिणीचे सल्लागार संपादक श्री ढगे यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी परिचय केंद्राच्या  जनसपंर्क अधिकारी तथा उपसंचालक (माहिती )(अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री ढगे यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.

यावेळी श्री ढगे यांनी संपाद‍ित केलेले भाई ॲड. रमाकांत खलप अमृत महोत्सवी गौरव ग्रंथश्रीमती अरोरा यांना भेट स्वरूप दिले. श्री ढगे गोव्यातील नामांकित इन गोवाया 24 तास चालणा-या मराठी आणि इंग्रजी वाहिणीच्या सल्लागार संपादक म्हणुन काम बघतात.  त्यांची आतापर्यंत 12 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

श्रीमती अरोरा यांनी परिचय केंद्राच्यावतीने राबविण्यात येणा-या दैनंदिन तसेच नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गतही राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती श्री ढगे यांना दिली. श्री ढगे यांनी  परिचय केंद्राच्या वतीने दिल्लीतून होणा-या कामाचे कौतूक केले. यावेळी   श्री ढगे यांनी परिचय केंद्राच्यवतीने राबविण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानासाठी शुभ संदेश दिला.

000000

 

No comments:

Post a Comment