Monday 8 August 2022

राज्यातील मत्स्य व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी केंद्राची सकारात्मक भूमिका : विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर





नवी दिल्ली 8 : राज्यातील मत्स्य व्यवसायातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राची सकारात्मक भूमिका असल्याची, माहिती आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी दिली.

            केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष ॲड.  नार्वेकर यांनी भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसायात येणा-या समस्या मांडल्या. यावर केंद्र शासनाकडून यावषियक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांनी दिले असल्याचे   श्री नार्वेकर यांनी बैठकीनंतर सांगीतले.

            समुद्रामध्ये विशिष्ट आर्थिक क्षेत्र (exclusive economic zone) अंतर्गत म्हणजे 12 नॉटीकल माईल सीमेच्याबाहेर येणा-या अडचणीबद्दल काही मागण्या मच्छीमारांच्या होत्या. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.

याबैठकीस मच्छीमारांचे शिष्टमंडळही उपस्थित होते. मच्छीमारांना येत असणा-या समस्या त्यांनीही मांडल्या. यावर केंद्रीय मंत्री यांनी सांगितले, लवकरच याविषयावर उपाययोजना सुचवून त्याची अमलबजावणी केली जाईल. ॲड.  नार्वेकर यांनी मच्छीमांराचा विषय  केंद्रीय ‍ मत्स्यपालन सचिव जे.एन. स्वेन यांच्यासोबत चर्चा केली.


No comments:

Post a Comment