Wednesday 17 August 2022

महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रात समूह राष्ट्रगीत गायन

 

                 







नवी दिल्ली दि. 17 : स्वराज्य महोत्सवांतर्गत आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात समूह राष्ट्रगीत गायनकरण्यात आले. 

              भारतीय स्वातंत्र्याला ७५ पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनानेही या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. राज्य शासनाच्यावतीने ९ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले व उपक्रमांतर्गत आज राज्यशासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतही महाराष्‍ट्र शासनाच्या कार्यालयांमध्ये समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले.

                कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे आणि सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन झाले.  महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या  उपक्रमात सहभाग घेतला.                                                

                                 महाराष्ट्र परिचय केंद्रात समूह राष्ट्रगीत गायन

               महाराष्ट्र परिचय केंद्रातही माहिती अधिकारी अंजू निमसरकर  यांच्या उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन झाले. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी  या  उपक्रमात सहभागी झाले.

No comments:

Post a Comment