Saturday, 19 November 2022

महाराष्ट्र सदनात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

 

 

नवी दिल्ली, 19 : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे  साजरी करण्यात आली.

           कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा  निवासी आयुक्त (प्रभारी) डॉ. निधी पांडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

इंदिरा गांधी यांची जयंती ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना  राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

00000

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

http://twitter.com/micnewdelhi       

वृत्त वि. क्र. 175  / दिनांक  19.11.2022 



No comments:

Post a Comment