नवी दिल्ली, १२ : राजमाता जिजाऊ आणि स्वामी
विवेकानंद यांची जयंती
आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय
केंद्रात साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता
जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती
साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी
वरीष्ठ सहायक संचालक राजेंद्र राणे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे,
यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहिली.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
/वि.वृ.क्र. 4/दि.12.01.2023
No comments:
Post a Comment