Thursday, 16 February 2023

‘आदि महोत्सवा’त महाराष्ट्रातील आदिवासींची दालने

 


आजपासून राजधानी दिल्लीत आदि महोत्सव सुरू

 

नवी दिल्ली , 16 : राजधानी दिल्लीत आजपासून आदि महोत्सव सुरू झालेला आहे. यात राज्यातील अदिवासी संस्थांची तसेच कारागीरांची दालने उभारली आहेत.

 

येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेड‍ियममध्ये आजपासून आदि महोत्सवाची सुरूवात झाली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा उपस्थित होते. हा मेळा 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

 

आदि महोत्सवात 200 पेक्षा अधिक दालने आहेत. यामध्ये आदिवासी समाजातील समृद्धता आणि सांस्कृत‍िक पंरपरेचे दर्शन घडविले जाईल. हे वर्ष अंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष (भरडधान्य/ श्री अन्न) म्हणुन साजरे केले जात आहे. यातंर्गत येथे आदिवासी समाजात रोजच्या जेवणात वापरण्यात येणारे भरड धान्याचे दालने ही आहेत. यासोबत हस्तकला, हातमाग, मातीची भांडे, दागदागिने, अलंकार, सजावटीच्या वस्तू इत्यादी आदि महोत्सवाचे आकर्षण आहे.

 

राज्याच्यावतीने याठ‍िकाणी दालने उभारली आहेत. यातंर्गत तीन वारली चित्रकार कारागीर, जिल्हा गडचिरोली, तालूका धानोरा येथील दिपज्योती लोकसंचालित सधन वनधन विकास केंद्राच्यावतीने दोन दालने आहेत. यात आदिवासी समाज जीवनातील खाद्य पदार्थांचे दालने आहेत. एक आदिवासी शेतकरी उत्पाद‍ित कपंनीच्या वस्तुंची दालन आहे. आणखी एक ऑरगानिक वस्तुंच्या उत्पादनाची स्टाल राज्याच्यावतीने आहे.

 

सकाळी 11 ते रात्री आठपर्यंत आदि महोत्सव सुरू राहणार आहे. राज्याच्या दालनाला भेट देण्याचे आव्हान ट्रायफेडतर्फे यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment