नवी दिल्ली , 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ,राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त तथा अपर निवासी आयुक्त निवा जैन यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस तसेच, कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
********************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 54 /दि.12.03.2023



No comments:
Post a Comment