नवी दिल्ली,
दि. 11 : थोर
समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उभय
महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील
महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री.रमेश
बैस यांनी पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय
मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहीर, प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती
निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहिली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित
कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी
आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
महाराष्ट्र
परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय
केंद्राच्या प्रभारी उपसंचालक माहिती अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प
अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहिली.
No comments:
Post a Comment