नवी
दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63
वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
उभय महाराष्ट्र सदनात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांच्या हस्ते आज ध्वजारोहण
करण्यात आले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित
आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीता
सोबत राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा...’ उपस्थितांनी गाऊन
ध्वजवंदन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी कस्तुरबागांधी स्थित
महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करुन अभिवादंन
केले.
या कार्यक्रमास राज्यसभेचे
खासदार इमरान प्रतापगडी, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र सदन व
महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात
निवासी असणारे अभ्यागंत, दिल्लीस्थित
महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि दिल्लीत विविध
क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कस्तुरगांधी स्थित
महाराष्ट्र सदन येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय व महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त
विद्यमाने ‘पदमावती कला संस्कार” समुहाच्यावतीने
महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी चार वाजता पासून सुरु होणार आहे.
यासह सार्वजनिक उत्सव
समिती यांच्यावतीने माणिक निर्मित अतुल
अरुण दाते प्रस्तुत “ललना मना” कवियत्री, गीतकार, स्त्री संगीतकार, कथा लेखिका
, दिग्दर्शिक , निर्मित्या यांना मानाचा
मुजरा... स्त्री कलानिर्मितीची 700 वर्ष !! असा सांस्कृतिक कार्यक्रम आज
सायंकाळी 6 वाजता श्रीराम सेंटर, मंडी हाऊस येथे होणार असून दोन्ही कार्यक्रम
महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठी बांधवांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. या
सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून मनमुराद आनंद लुटावा, असे आयोजकांच्यावतीने
आव्हान करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment