नवी दिल्ली दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती महाराष्ट्र सदनात मोठया उत्साहाने आज साजरी करण्यात आली.
कस्तुरबा
गांधी स्थित नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार
महादेव जानकर, प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते
अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात
आले. यावेळी धनगर समाजातील लोक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित
मान्यवरांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांची
महती याप्रसंगी विशद केली.
कोपर्निकस
मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी
सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र
परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले.
परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी अहिल्यादेवी होळकर
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी कार्यालयात
उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
No comments:
Post a Comment