नवी दिल्ली, दि. 28 : थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती
आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी श्रीमती नीवा जैन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
*****
आम्हाला
ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment