Wednesday, 26 July 2023

महाराष्ट्रात 5 हजार 441 किलो मीटर रेल्वेचे विद्युतीकरण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली, 26 : भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज जाळे 59, 096 रूट किलोमीटरचे विद्युतीकरण (RKM) झालेले आहे. यापैकी महाराष्ट्रात 5 हजार 441 किलो मिटर रेल्वेचे विद्युतीकरण झालेले आहे. ही माहिती 30 जुन 2023 पर्यंतची अद्यावत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ‍ि भारतीय रेल्वे ने वर्ष 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक बनण्याचे उद्द‍िष्ट ठेवले आहे. यासाठी विविध उपाय योजले जात आहे, यातंर्गत ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, जसे हेड ऑन जनरेशन (HOG) तंत्रज्ञानाचा वापर, कोचमध्ये एलईडी लाईट्सचा वापर, उच्च दर्ज्याचे तारांकित (स्टार रेटेड) उपकरणाचा वापर करण्यात येत आहे. पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन यासह मोठया प्रमाणात वनीकरण करण्यात येत आहे. विद्युतीकरणाच्या कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या वैधानिक परवानग्या मिळण्यास थोडा विलंब होत आहे. हा विलंब टाळण्यासाठी काही ठोस पावले रेल्वे मंत्रालयाकडून उचलली गेली असल्याचीही माहिती श्री वैष्णव यांनी यावेळी दिली. विद्युतीकरणाचे कार्य करण्यात काही अडचणी दूर करण्यासाठी प्रोजेक्ट मॉनिटरिंग ग्रुप (PMG) पोर्टल बनविले आहे. तसेच रेल्वे बोर्ड स्तरावरील प्रकल्पांना सुरळीत आणि जलद मंजूरीसाठी रेल्वे बोर्डामध्ये ‘गती शक्ती संचालनालय’ उभारले आहे. प्रभावी प्रकल्प देखरेख यंत्रणा सुनिश्चित करणे, याशिवाय, मोठ्या आकाराचे प्रकल्प ‘इंजिनीअरिंग प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन’ (EPC) कॉन्ट्रॅक्ट मोडमध्ये कार्यान्वित केले जात आहेत. खात्रीशीर निधीची व्यवस्था केली जात आहे. प्रकल्प अंमलबजावणी आणि पूर्णत्वास गती देण्यासाठी फील्ड युनिट्सना आर्थिक अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जात आहे. अशी लिख‍ित माहिती श्री वैष्णव यांनी रेल्वेच्या विद्युतीकरणा सदंर्भात लोकसभेत दिली. 00000000000 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi /वृत्त क्र.133 / 26 .7 .2023

No comments:

Post a Comment