नवी दिल्ली, 11 : वस्तु व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये 7 अपीलीय न्यायाधिकारण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.
वित्त मंत्रालयाच्यावतीने आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची 50 वी बैठक येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आली. या बैठकीची अध्यक्षता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस राज्याच्यावतीने उपस्थित होते. यासह राज्याच्या वित्त सचिव शैला ए. आणि जीएसटी आयुक्त राजीव कुमार मित्तल उपस्थित होते. आज पार पडलेल्या 50 बैठकीत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले.
बैठकीनंतर श्री मुनगंटीवार यांनी सांगितले, आज झालेल्या वस्तु व सेवाकर परिषदेच्या महत्वाच्या बैठकीत राज्यात वस्तु व सेवाकराशी निगडीत तक्रारीचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात 7 अपीलीय न्यायाधिकरण असावे,अशी राज्याची मागणी होती. आजच्या बैठकीत ही मागणी मंजुरी करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ऑनलाईन खेळ, घोडयाची शर्यत (हॉर्स रेसिंग), कॅसीनो या बांबीवर आता 28% टक्के कर आकारण्यात येणार असल्याचेही श्री मुंनगटीवार यांनी यावेळी सांगितले. कायदयामध्ये ऑनलाईन हा शब्द नसल्याने यासंदर्भात काही केसेस कोर्टात दाखल करण्यात आले होते. आता मात्रा कायदयात अतिशय स्पष्टता आणण्यात आल्यामुळे ऑनलाईन गेमिंगचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या महसुलात निश्चितच भर पडेल असेही श्री मुनगंटीवार यांनी यावेळी नमुद केले.
0000000000
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
अंजु निमसरकर /वृत्त क्र.119 / 11.7.2023
No comments:
Post a Comment