Friday, 11 August 2023

 


राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 साठी  आवाहन

नॅशनल अवॉर्ड पोर्टलव्दारे 15 ऑगस्टपासून नामांकन करता येईल

अंत‍िम  तारीख 15 सप्टेंबर

नवी दिल्ली, 11 : केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी  प्रदान केला जाणारा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार साठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे. नॅशनल अवॉर्ड पोर्टलव्दारे ऑनलाईन अर्ज  15 ऑगस्टपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 राहणार आहे.

दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था, दूध निर्मिती कंपनी (एमपीसी),दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्यावतीने प्रदान केले जातो. यावर्षी या पुरस्कांरासाठी नॅशनल अवॉर्ड पोर्टलव्दारे ऑनलाईन पद्धतीने  15 ऑगस्टपासून अर्ज  मागविण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्यांनी  https://awards.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी.

शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उलब्ध व्हावी केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागातर्फे पशुसवंर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त असून त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये  महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर 2014 मध्ये राष्ट्रीय गोकुळ अभियान(आरजीएम) सुरु करण्यात आले. यातंर्गत देशी गायी- म्हशींवर संशोधन आणि दूध क्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जाते.

वर्ष 2023 या वर्षासाठी  विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा  सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे),  सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था (डीसीएस)/ दूध निर्मिती कंपनी (एमपीसी)/दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना (एफपीओ), सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) अशी श्रेणी केली आहे.

 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 प्राप्त पहिल्या दोन विभागांसाठी म्हणजेच सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट डीसीएस/ एफपीओ/ एमपीसी यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाईल. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.5,00,000/- (पाच लाख रुपये) तर व्दितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी  रु.3,00,000/-(तीन लाख रुपये) दिले जाईल.

सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) विभागासाठी पहिल्या तिन्ही क्रमांकांच्या पुरस्कारामध्ये केवळ गुणवत्ता प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह  यांचा समावेश असेल. राष्ट्रीय दुग्ध दिवसाचे औचित्य साधून  26 नोव्हेंबर 2023  या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

            या पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता आणि  ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींचे तपशील जाणून घेण्यासाठी  https://awards.gov.in  किंवा  https://dahd.nic.in संकेतस्थळांना भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

गायींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)

 

S.N.

Breed

Home Tract

1

Amritmahal

Karnataka

2

Bachaur

Bihar

3

Bargur

Tamilnadu

4

Dangi

Maharashtra and Madhya Pradesh

5

Deoni

Maharashtra and Karnataka

6

Gaolao

Maharashtra and Madhya Pradesh

7

Gir

Gujarat

8

Hallikar

Karnataka

9

Hariana

Haryana, Uttar Pradesh and Rajasthan

10

Kangayam

Tamilnadu

11

Kankrej

Gujarat and Rajasthan

12

Kenkatha

Uttar Pradesh and Madhya Pradesh

13

Kherigarh

Uttar Pradesh

14

Khillar

Maharashtra and Karnataka

15

Krishna Valley

Karnataka

16

Malvi

Madhya Pradesh

17

Mewati

Rajasthan, Haryana and Uttar Pradesh

18

Nagori

Rajasthan

19

Nimari

Madhya Pradesh

20

Ongole

Andhra Pradesh

21

Ponwar

Uttar Pradesh

22

Punganur

Andhra Pradesh

23

Rathi

Rajasthan

24

Red Kandhari

Maharashtra

25

Red Sindhi

On organized farms only

26

Sahiwal

Punjab and Rajasthan

27

Siri

Sikkim and West Bengal

28

Tharparkar

Rajasthan

29

Umblachery

Tamilnadu

30

Vechur

Kerala

31

Motu

Orissa,Chhattisgarh and Andhra Pradesh

32

Ghumusari

Orissa

33

Binjharpuri

Orissa

34

Khariar

Orissa

35

Pulikulam

Tamilnadu

36

Kosali

Chhattisgarh

37

MalnadGidda

Karnataka

38

Belahi

Haryana and Chandigarh

39

Gangatiri

Uttar Pradesh and Bihar

40

Badri

Uttarakhand

41

Lakhimi

Assam

42

Ladakhi

Jammu and Kashmir

43

Konkan Kapila

Maharashtra and Goa

44

PodaThurpu

Telangana

45

Nari

Rajasthan and Gujarat

46

Dagri

Gujarat

47

Thutho

Nagaland

48

Shweta Kapila

Goa

49

Himachali Pahari

Himachal Pradesh

50

Purnea

Bihar

51

Kathani

Maharashtra

52

Sanchori

Rajasthan

53

Masilum

Meghalaya

 

म्हशींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)

 

Sr. No

Breed

Home Tract

1

Bhadawari

Uttar Pradesh and Madhya Pradesh

2

Jaffarabadi

Gujarat

3

Marathwadi

Maharashtra

4

Mehsana

Gujarat

5

Murrah

Haryana

6

Nagpuri

Maharashtra

7

Nili Ravi

Punjab

8

Pandharpuri

Maharashtra

9

Surti

Gujarat

10

Toda

Tamilnadu

11

Banni

Gujarat

12

Chilika

Orissa

13

Kalahandi

Odisha

14

Luit (Swamp)

Assam and Manipur

15

Bargur

Tamil Nadu

16

Chhattisgarhi

Chhattisgarh

17

Gojri

Punjab and Himachal Pradesh

18

Dharwadi

Karnataka

19

Manda

Odisha

20

Purnathadi

Maharashtra

 

00000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा : http://twitter.com/MahaGovtMic

मपकेंनदि /वृत्त क्र.149 / 11.08.2023

No comments:

Post a Comment