नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी श्री रुपिंदर सिंग यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यावेळी सदनातील अधिकारी- कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली .
महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती)अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा : http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.156 / 18.08.2023
.jpg)

No comments:
Post a Comment