Tuesday, 8 August 2023

रूपिंदर सिंग महाराष्ट्र सदनचे नवे निवासी आयुक्त



 


 

नवी दिल्ली , 8: महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्याकडून त्यांनी  निवासी आयुक्त पदाचा पदभार सोमवारी स्वीकारला.

 

            श्री रूपिंदर सिंग हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९६ च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी, ते केंद्र शासनाच्या युनीक आयडेंटिफिकिशेन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) येथे उपमहासंचालक पदावर सात वर्ष कार्यरत होते.

 

युनीक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया एक वैधानिक प्राधिकरण असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिनस्त कार्यरत संस्था आहे. ही वैधानिक संस्था केंद्र सरकारद्वारे आधार कायदा 2016 च्या तरतुदींनुसार स्थापन करण्यात आली आहे.

 

         श्री. रूपिंदरसिंग यांनी  महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक प्रभारी अमरज्योतकौर अरोरा यांनी श्री. रूपिंदरसिंग यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना माहे जुलै 2023 चे लोकराज्य अंकाची प्रत भेट केली.

 

***********

 

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा : http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.146 / 08.08.2023


 

No comments:

Post a Comment