नवी दिल्ली, 14 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर सिंग यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 201, दि.14.11.2023
No comments:
Post a Comment