नवी दिल्ली, 19: देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित
कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी इंदिरा गांधी यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी शपथ दिली.
00000000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment