Friday, 29 December 2023

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन 'सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार



नवी दिल्ली 29 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड़मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजने’अंतर्गत विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्रकाशन वर्ष 2023 करिता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके आणि प्रवेशिका या स्पर्धेसाठी 31 जानेवारी  2024 पर्यंत पाठविता येणार आहे.

एकूण 4 विभाग, 35 साहित्य प्रकार आणि 29 लाख रूपयांचा पुरस्कार

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात 35 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे एकूण 22 लाख रूपयांची पुरस्कारांची रक्कम आहे.बाल वाङ्मय विभागात एकूण साहित्य प्रकारात प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.

प्रथम प्रकाशन प्रकारातील एकूण साहित्य प्रकारांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये या प्रमाणे एकूण लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.

सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी  साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’  (पुरस्कार रक्कम 1,00,000 रूपये)  प्रदान करण्यात येणार आहे.

बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य प्रकार) साठी निवड केली जाईल.  प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्याकडे  31 जानेवारी 2024 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर नवीन संदेश’ या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे.  यासह  या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दूसरा मजला, सयानी रोड, प्रभा देवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात  उपलब्ध आहे. तसेच, बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबाखडक सिंह मार्ग, नवी दिल्ली  या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे.

ज्या लेखक व प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेलत्यांनी (मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी) पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात.

मुंबई वगळता राज्यातील अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे तर बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांनी थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुख्य कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयाकडे हे साहित्य व प्रवेशिका जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

पुरस्कारासाठीची प्रवेशिका व नियमावली इच्छुकांना पाहण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी या कार्यालयात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग , बाबा खडक सिंग मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयास भेट द्यावी.  

0000000

 

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.22 / दिनांक 29.12.2023


 

Tuesday, 26 December 2023

राजधानीत बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या शौर्याला अभिवादन

 




नवी दिल्ली 26:  भारतात 26 डिसेंबर हा दिवस  वीर बाल दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस गुरु गोबिंद सिंगांचे सुपुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि साहिबजादा बाबा फतेह सिंग यांच्या पराक्रम आणि बलिदानाची आठवण म्हणून पाळला जातो. यानिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर सिंग यांनी बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या शौर्याला अभिवादन

 

         महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक(माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी  बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित  कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0 0 0 0 0

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.223  / दिनांक 26.12.2023

 

 



Monday, 25 December 2023

राजधानीत माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी



 

नवी दिल्ली 25: माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

 

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर सिंग यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त  श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0 0 0 0 0

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.222  / दिनांक 25.12.2023

 

 

 

Friday, 22 December 2023

महाराष्ट्राचे चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार



राष्ट्रपतींच्या हस्ते नऊ जानेवारी 2024 रोजी पुरस्काराचे वितरण

 

नवी दिल्ली , 22 : वर्ष 2023 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बुधवारी रात्री जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नऊ जानेवारी 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

 

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि  क्रीडा  मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी दोन खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार तर 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह  एकूण नऊ खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांनाद्रोणाचार्य श्रेणीतील जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कारव ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यासोबतच ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देशातील तीन  खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद चषक गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना घोषित करण्यात आला आहे.

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्रचे बॅडमिंटन पट्टू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राचे मलखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा समावेश आहे. तर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी ओस देवतळे आणि आदिती स्वामी यांना आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, तर अर्जुन पुरस्कार हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देखील दिले जाते.

ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत 21 वर्षीय ओजसने सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून आणखी एक विक्रम केला. नागपूरचा गोल्डन बॉय तिरंदाज ओजस देवतळे याच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नाव जाही झाले आहे.

सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720  पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

सलग चारवर्ष कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते.  खेळात तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो.  खेळाडूंच्या मागील चार वर्षांतील उत्तम प्रदर्शन, नेतृत्व, खेळ आणि त्यातील शिस्तीसाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळातील प्रशिक्षण देण्यासाठी आणि खेळाडुंकडून स्पर्धांसांठी उत्कृष्ट कार्य करून घेणा-या क्रीडा प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली जाते.

खेळ आणि स्पर्धेमधील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार दिला जातो. यामध्ये खेळाडूंच्या चांगले प्रदर्शन आणि सेवानिवृत्तीनंतरही संबंधित क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देत राहण्यासाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉरपोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने गौरिवण्यात येते.  आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.

 

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन) अर्जुन पुरस्कार:ओजस देवताळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बोल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’

 

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब). ’ 

 

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’ 

 

ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)

 

 

********************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा

  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 221 /दि. 22. 12. 2023

Tuesday, 19 December 2023

‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग

नवी दिल्ली, 19: ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आज केले. महाराष्ट्रात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे महाराष्ट्र परिचय केंद्रातील प्रदर्शन म्हणजे दिल्लीतील मराठी माणसांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे मत श्री सिंग यांनी येथे मांडले. महाराष्ट्र परिचय केंद्रात, दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तसेच प्रधान सचिव श्री रुपिंदर सिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री सिंग यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते. दिवाळी हा सर्वसामान्य भारतीयांचा प्रमुख सण म्हणून देशभर साजरा केला जातो. महाराष्ट्रात दिवाळी निमित्त निघणा-या दिवाळी विशेषाकांच्या पंरपरेमुळे आता या सणाला बौध्द्कितेची जोड म्हणजे दिवाळी अंक. महाराष्ट्रात आणि देशभर जिथे मराठी लोक राहतात तिथूनही विशेषांक प्रकाशित केले जातात. महाराष्ट्रात 1909 पासून सुरू झालेल्या दिवाळी विशेषकांची पंरपरा आज 115 वर्षापर्यंत पोहोचली. दिवाळी विशेषांक हा अक्षर सोहळा म्हणून आता दरवर्षी साजरा होत आहे. वाचकांच्या अभिरूचींना जपत आज जवळपास सर्वच विषयांवर दिवाळी अंक बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांमुळे नवोदित लेखकांपासून तर प्रतिष्ठित लेखकांपर्यंतचे विविध विषयांवरील लेखन यामध्ये कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख एकाच अंकात वाचण्याची पर्वणी यानिमित्ताने मिळत असल्याचेही निवासी आयुक्त श्री सिंग यावेळी म्हणाले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने विशेषांक प्रदर्शन ही येथील वाचकांसाठी वाचन महोत्सव असून दिल्ली परिसरातील वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री सिंग यांनी यावेळी केले. प्रदर्शनात 120 दिवाळी अंकांची मेजवानी या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज, मिळून सा-याजनी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत-दिपोत्सव, साप्ताहिक सकाळ, झी मराठी आदि 130 दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आज पासून सुरू झाले असून, शुक्रवारी 22 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार व सकाळी 10 वाजता पासून ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावर्षीच्या दिवाळी विशेषांकामध्ये ‘धनंजय, जत्रा, साधना, सामना, आवाज, अक्षरधारा, किशोर, प्रपंच, छावा, मैत्र, निनाद, हंस, ऋतुरंग, स्वरप्रतिभा, अंतर्नाद‍’ असे एकापेक्षा एक सरस अंक आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ग्रंथालयातील वाचक सदस्यांसाठी दिवाळी अंक उपलब्ध राहतील. 00000000000000 आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 219 /दि. 19. 12. 2023

Monday, 18 December 2023

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये नऊ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी केली जाणार

नवी दिल्ली, 18: महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ईएसआयसी रुग्णालयांची कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईएसआयसीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटा शंभरवरून एकशे वीसवर नेण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आल्याचे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात उल्लेख आहे. तसेच, अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभ, तसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजूरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्यासोबतच, गुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहे, तर, ओडिशातील राऊरकेलामधल्या रुग्णालयात खाटांची संख्या 75 वरून दीडशेवर नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.