नवी दिल्ली, 12: राजमाता
जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय
केंद्रात आज साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्गस्थित
महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात
हिंगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी
विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी
आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर
सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, डॉ.प्रतिमा गेडाम उपस्थित
होते. यावेळी सर्व उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी खासदार पाटील
म्हणाले, "राजमाता जिजाऊ यांनी आपल्या पराक्रमाने स्वराज्याचे स्वप्न साकारले. तर
स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांनी आणि कार्याने भारतीय संस्कृतीला जगभरात
पोहोचवले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत."
महाराष्ट्र परिचय केंद्रात
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती
साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या
उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन
केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण
करून आदरांजली वाहिली.
****************
आम्हाला
ट्विटर वर फॉलो करा
http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 07 /दि. 12.01.2024
No comments:
Post a Comment