Tuesday, 16 January 2024

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद







नवी दिल्ली, 16: ‘जाणता राजा, मामाच्या गावाला जाऊ या, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, आई आई करना गं भेळ …,’ अशा एका पेक्षा एक अजरामर कविता पाचवी ते नव्वीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या काव्य स्पर्धेला नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत नूतन मराठी शाळेत काव्य स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नव्वी पर्यंच्या एकूण 25  विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

मूळ हिंदी भाषिक असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून गेय स्वरूपात मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन मुलींना विभागून देण्यात आले.  तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

नूतन मराठी शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल, शिक्ष‍िका भावना बावने, सुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला होता.

इयत्ता आठवीच्या वर्गातील निखिल या विद्यार्थीने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. निखिलच्या फुग्या फुग्या फुगशील किती या कवितेचे पठन अभिनयासह करत सर्व उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. इयत्ता नव्वीतील वर्गातील हर्षित याने शिवाजी महाराजांवर जाणता राजा कवितेचे गायन करत द्वितीय क्रमांक पटकावला तर नंदिनी आणि कोमल या विद्यार्थ्यांनीनी चॉकलेटचा बंगला व आई मी नाही अभ्यास केला, या कविता प्रस्तुत केल्या, या दोघींना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

            या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होते. 

000000000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा

http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 09 /दि. 16.01.2024


 

No comments:

Post a Comment