Friday, 2 February 2024
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2023 योजना नामनिर्देशन सादर करण्याची 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत वाढली
नवी दिल्ली, 02: देशभरातील सनदी अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत अशा अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून, त्यांना सन्मानित करण्यासाठी, केंद्र सरकारने सार्वजनिक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार योजना सुरू केली आहे.
वर्ष 2023 साठी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीच्या पंतप्रधान पुरस्कार योजनेत सुधारणा करून, त्यात जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासात सनदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा, विविध श्रेणींमध्ये समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी देण्यात येणारा पंतप्रधान पुरस्कार, 2023 अंतर्गत नामांकनाची तारीख 12 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे.
नामांकनांच्या श्रेणींमध्ये -- श्रेणी-1- 12 प्राधान्य क्षेत्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास. या श्रेणीत 10 पुरस्कार दिले जातील. तसेच, श्रेणी 2 मध्ये केंद्रीय मंत्रालये/विभाग, राज्ये, जिल्ह्यांसाठी नवकल्पना. या अंतर्गत 6 पुरस्कार दिले जातील.
अर्जदारांद्वारे डेटा अपलोड करण्याची आवश्यकता आणि विविध संस्थांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या केंद्र सरकारने लक्षात घेऊन, वेब-पोर्टलवर (www.pmawards.gov.in ) नोंदणी आणि ऑनलाइन नामांकन सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2023 अंतर्गत सादर करण्याची अंतिम तारीख 31.01.2024 ते 12.02.2024 (1700 तास) पर्यंत वाढवण्यात आली आहे.
******************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.29 / दिनांक 02.02.2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment