नवी दिल्ली, 11 : देशात पहिली मुलींची शाळा सुरू
करुन स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचणारे थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत
महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उभय महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांनी पुतळ्याला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र. 52, दि.11.04.2024
No comments:
Post a Comment