नवी
दिल्ली, 14 : महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते, डॉ. बाबासाहेब
भीमराव रामजी आंबेडकर यांची 133 वी जयंती उभय महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रात आज उत्साहात
साजरी करण्यात आली.
बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय,
दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ
आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला
नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.
कस्तुरबा
गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात, निवासी
आयुक्त रूपिंदरसिंग यांनी पुतळ्याला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी सहायक
निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कॉपर्निकस
मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेस निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी पुष्पअर्पण करुन विनम्र अभिवादन
केले. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय
केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा
यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यांच्यासह परिचय केंद्राच्या
कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
सकाळी संसद भवन परीसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, यांच्यासह केंद्रीय मंत्री, खासदार श्री, मल्लिकार्जून खरगे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचे अुनयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
.jpeg)

.jpeg)
.jpeg)


No comments:
Post a Comment