नवी
दिल्ली , 14: स्वराज्य
रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती
महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित
कार्यक्रमात निवासी आयुक्त व प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराज
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त
डॉ राजेश अडपावार व स्मिता शेलार यासोबत इतर वरिष्ठ अधिका-यांनीही त्यांच्या
प्रतिमेस आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात छत्रपती संभाजी महाराज यांना
अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यालयातील
उपस्थित कर्मचाऱ्यांनीही यावेळी त्यांना श्रध्दाजंली वाहिली.
******************
आम्हाला ट्विटर वर फॉलो
करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.62/ दिनांक 14.05.2024
No comments:
Post a Comment