Wednesday 9 October 2024

इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती, समुदायांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस


 


नवी दिल्ली, 09: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) आज  केंद्र सरकारकडे (i) लोध, लोधा, लोधी (Lodh, Lodha, Lodhi) या ओबीसी जाती / समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे; तसेच (ii) बडगुजर (Badgujar), (iii) सूर्यवंशी गुजर (Suryavanshi Gujar), (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर (Leve Gujar, Reve Gujar, Reva Gujar); (v) डांगरी (Dangari); (vi) भोयर, पवार (Bhoyar, Pawar); (vii) कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, बुकेकरी (Kapewar, Munnar Kapewar, Munnar Kapu, Telanga, Telangi, Pentarreddy, Bukekari) जाती/समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे.

 

         याबाबत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल यांचा समावेश असलेल्या आयोगाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 17 ऑक्टोबर 2023 आणि 26 जुलै 2024 रोजी मुंबई येथे यासंदर्भात सुनावणी घेतली होती.  मंगळवारी 8 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय विभागाने दिली आहे.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 131/ दिनांक 09.10.2024

No comments:

Post a Comment