नवी दिल्ली, 14: आदिवासी समाजाचे शूर योद्धा आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमात बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.
कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील
सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांनी बिरसा
मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते. उपस्थित सर्वांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
*****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment