Wednesday, 24 November 2021

महत्वाची धोरणे प्रतिबिंबित करणाऱ्या महाराष्ट्र दालनास आयआयटीएफमध्ये उत्तम प्रतिसाद










 

नवी दिल्ली , २४ : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ)  विद्युत धोरण, स्टार्टअप व हस्तकलांच्या वस्तूंनी सज्ज महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे .

               महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती संकल्‍पनेवर सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. या दालनात राज्यशासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विद्युत वाहन धोरण, विविध स्टार्टअप, औरंगाबाद औद्योगिक शहर, कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. राज्याची समृध्द हस्तकला दर्शविणारे उद्योग समूह (क्लस्टर्स),बचतगट  आदींचे उत्पादने  प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

              केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्यावतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन) प्रगती मैदानावर सुरु असलेल्या ४०व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात भेट देणाऱ्या देश-विदेशातील ग्राहकांना महाराष्ट्र दालन आकर्षित करीत आहे.

                                           विद्युत वाहन धोरण व स्टार्टअप्सचे आकर्षण

         दालनाच्या दर्शनी भागात स्थित टाटा नेक्सॉन या चार चाकी विद्युत गाडीकडे ग्राहकांची ओढ दिसते. या गाडीत बसून तसेच गाडीचे निरिक्षण करून ही ग्राहक मंडळी राज्याच्या विद्युत धोरणाचीही माहिती घेत आहेत  व आपल्या जिज्ञासा, शंका व प्रश्नांचे निरसण करून घेत आहेत . येथून बाहेर पडताना ‘वा, महाराष्ट्र सरकार अच्छी पहल कर रही है’ अशा उत्सफुर्त प्रतिक्रियाही देत आहेत.     

                  दालनाच्या प्रवेशद्वारावरच महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची उत्पादने व त्यांचे उत्तम सादरीकरण ग्राहकांची पसंती मिळवत आहे. आत्मनिर्भरतेचा संदेश देणारी भली मोठी वज्रमुठ आणि त्याभोवती फिरणा-या खास सायकली,ड्रोन आणि वॉशरुम ओडर फ्री इंस्ट्रुमेंट तर दालनाला भेट देणा-यांना येथेच थबकवते. पुणे येथील जीएमएस स्टार्टअप्सने तयार केलेल्या टायटेनियमपासून निर्मित ,वजनाने हलक्या  व आकर्षक सायकली , मुंबईच्या  स्कायडॉक स्टार्टअपकडून तयार करण्यात आलेले आकर्षक ड्रोन व त्याचे ॲडव्हान्स फीचर जाणून  घेण्यासही येथे गर्दी दिसत आहे. न्हानी घरातील दुर्गंध बाहेर काढणारे खास यंत्रही (वॉशरुम ओडर फ्री इंन्ट्रुमेंट) येथे ग्राहकांच्या  पसंतीस उतरत आहे.

                  महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य केंद्र ‘मैत्री’, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘उमेद’, महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या ‘माविम’, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आणि खादी ग्रामोद्योग विभागाशी  संलग्न आठ उद्योग समुहांची  (क्लस्टर) उत्पादनेही येथील स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. राज्याची प्रसिध्द पैठणी साडी, सांगलीची प्रसिध्द हळद, कोल्हापुरी चप्पला व अन्य पादत्राणे, चंद्रपूर  व गडचिरोलीचे अनुक्रमे कारपेट क्लस्टर आणि हस्तकलांचे स्टॉल्स, कुडाळ येथील वुडीग्रास हे बांबू पासून निर्मित फर्निचर व वस्तुंच्या स्टॉललाही या दालनास भेट देणाऱ्या  ग्राहकांची पसंती मिळत आहे व ते विक्रीही करीत आहेत.      

                   बृह्नमुंबई महानगर पालिकेचा स्टॉलही या दालनात उभारण्यात आला असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून गौरव असणा-या मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासाला चालणा देणारे कोस्टल रोड प्रकल्पाविषयी येथे सविस्तर माहिती व आकर्षक प्रदर्शन करण्यात आले आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडॉर अंतर्गत सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज व पर्यावरणपूरक अशी एक हजार एकरावर तयार होत असलेले औरंगाबाद औद्योगिक शहराविषयी माहिती देणारा आकर्षक स्टॉलही  या  दालणास भेट देणा-या व्यापार व उद्योग क्षेत्रातील मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे.          

     ‍ि                                                     00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

 रितेश  भुयार / वि.वृ.क्र. २४१ /दि. २४.११.२०२१

 

             

 

 

 

 

 

 

 

 

 

                       

 



 

Tuesday, 23 November 2021

महाराष्ट्रातील सात अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान







              वायुदल प्रमुख विवेक चौधरी यांना परमविशिष्ट सेवा पदक

                  

नवी दिल्ली , २३ : उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्टसेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते आज वर्ष २०२१ चे संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे सुपुत्र वायुदल प्रमुख विवेक चौधरी  यांच्यासह राज्यातील सहा अधिकारी व जवानांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले.

 

         संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२१’ चे वितरण करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख तथा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते अधिकारी व जवानांना कीर्ती चक्र, शौर्य चक्र, वीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक आदि सन्मानाने गौरविण्यात आले. 

                                       चार परम विशिष्ट आणि दोन अतिविशिष्ट सेवा पदक   

        या समारंभात राज्याचे सुपुत्र वायुदल प्रमुख विवेक राम चौधरी यांना उत्कृष्टसेवेसाठी परम वि‍शिष्ट  सेवा पदक प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट जनरल शशांक ताराकांत ऊपासनी,  लेफ्टनंट जनरल संजय मनोहर लोंढे, व्हाईस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांनाही उत्कृष्टसेवेसाठी परम विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले. लेफ्टनंट जनरल मिलिंद एन. भुरके आणि व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आली.

          याच समारंभात ४ , मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे महाराष्ट्राच्या मातीतील मेजर अनिल ऊर्स यांना दुर्दम्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. वर्ष २०२०च्या जानेवारी महिन्यात जम्मु-काश्मिरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर अनिल ऊर्स यांनी  कंपनी कमांडर या नात्याने मोहिमेचे नेतृत्व केले होते. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मेजर ऊर्स यांनी दहशतवाद्यांवर हल्ला चढवत तीन दहशत वाद्यांना ठार केले होते.  

00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

 रितेश  भुयार / वि.वृ.क्र. २४० /दि. २३.११.२०२१

 

             

 

 

 


 

Monday, 22 November 2021

राष्ट्रपतींच्या हस्ते संरक्षण अलंकरण सन्मान प्रदान ; महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा गौरव






                                   

  नवी दिल्ली , २२ : तिन्ही  संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख आणि राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते आज    संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी व जवानांचा समावेश आहे.

          राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आज दोन टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२०’ चे वितरण करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकारी व जवानांना उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि  समर्पण वृत्तीच्या प्रदर्शनासाठी  कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक अशा विविध सन्मानाने गौरविण्यात आले. 

                                             परम विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक   

      महाराष्ट्राचे सुपूत्र एअर मार्शल प्रदीप  बापट यांना परम  विशिष्ट सेवा पदक तर व्हाईस ॲडमिरल किरण  देशमुख ,एअर व्हाईस मार्शल निखिल चिटणीस आणि  एअर कमोडोर मकरंद रानडे यांना अतिविशिष्ट सेवा पदक  प्रदान  करण्यात आले.                               

          कॅप्टन महेश कुमार भुरे यांना असामान्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन भुरे यांनी दहशतवाद विरोधी कार्यवाहीचे अनुकरणीय नैतृत्व करत एका दहशतवाद्याला ठार केले व दहशतवाद्यांना परतवून लावले.

00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

 रितेश  भुयार / वि.वृ.क्र. २३९ /दि. २२.११.२०२१

 

Saturday, 20 November 2021

महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षणाचे राष्ट्रीय पुरस्कार

 


महाराष्ट्रातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतीच्यां हस्ते सन्मान

महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील दुसरा क्रमांक पटकवला

नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.  सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे.  यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.  

            आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा  नगरविकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार  वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणा-या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.  तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते वितरीत करूण गौरविण्यात आले.  तसेच  केंद्रीय राज्य मंत्री श्री कौशल यांच्याहस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत.   वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश  आहे. यामध्ये  राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला 6 कोटी रूपयांचा धनादेश बक्ष‍िस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण  48 शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये  राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत. या एकूण स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगीरी साठी राज्याला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे नगर विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्वीकारला त्यांच्यासोबत राज्य स्वच्छ मीशन (नागरी)चे अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शहरे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांची यादी सोबत जोडलेली आहे.

 

·        अमृत -"स्वच्छ शहर" पुरस्कार

 

 

१)     नवीमुंबई २) पुणे ३) बृहन्मुंबई ४ ) पनवेल

 

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

१

विटा नगरपरिषद

१०

तिवसा नगरपंचायत

२

लोणावळा नगरपरिषद

११

पन्हाळा नगरपरिषद

३

सासवड  नगरपरिषद

१२

मुरगुड नगरपरिषद

४

कराड नगरपरिषद

१३

धानोरा नगरपंचायत

५

हिंगोली नगरपरिषद

१४

भद्रावती नगरपरिषद

६

देवळाली - प्रवरा नगरपरिषद

१५

मूल नगरपरिषद

७

खोपोली नगरपरिषद

१६

दोंडाईचा - वरवाडे नगरपरिषद

८

कामठी नगरपरिषद

१७

खानापूर नगरपंचायत

९

पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद

 

 

·        नॉनअमृत -"स्वच्छ शहर" पुरस्कार

 

 

 

  

 

 

 

 

 

 

 

   ब) "कचरामुक्त शहरांचे  स्टार मानांकन "

 

• अमृत -"कचरामुक्त शहरांचे प्रमाण‍ित 3 स्टार मानांकन " पुरस्कार

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

१

लातूर महानगरपालिका

७

अहमदनगर
महानगरपालिका

२

कुळगांव-बदलापुर  नगरपरिषद

८

धुळे
महानगरपालिका

३

नवी मुंबईमहानगरपालिका

९

जळगांव
महानगरपालिका

४

पनवेल महानगरपालिका

१०

पुणे
 
महानगरपालिका

५

ठाणे
महानगरपालिका

११

सातारा नगरपरिषद

६

चंद्रपूर
 
महानगरपालिका

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

·        नॉनअमृत -"कचरामुक्त शहरांचे प्रमाणित 3 स्टार मानांकन "  पुरस्कार

 

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

अनु. क्र

नगरपरिषद/ नगरपंचायत

१

शेंदूरजनाघाट नगरपरिषद

३०

सेलू नगरपंचायत

२

तिवसा नगरपंचायत

३१

उमरेड नगरपरिषद

३

घनसांवगी नगरपंचायत

३२

बोधवड नगरपरिषद

४

हिंगोली नगरपरिषद

३३

देवळाली - प्रवरा नगरपरिषद

५

जाफराबाद नगरपंचायत

३४

एरंडोल नगरपरिषद

६

मानवत नगरपरिषद

३५

शिर्डी नगरपंचायत

७

नायगाव नगरपंचायत

३६

शिरपूर - वरवाडे नगरपरिषद

८

पाथरी नगरपरिषद

३७

सिन्नर नगरपरिषद

९

सेलू नगरपरिषद

३८

यावल नगरपरिषद

१०

सिल्लोड नगरपरिषद

३९

आष्टा नगरपरिषद

११

कर्जत नगरपरिषद

४०

गडहिंग्लज नगरपरिषद

१२

खेड नगरपरिषद

४१

इंदापूर नगरपरिषद

१३

खोपोली नगरपरिषद

४२

जेजूरी नगरपरिषद

१४

मुरबाड नगरपंचायत

४३

जुन्नर नगरपरिषद

१५

शहापूर नगरपंचायत

४४

कराड नगरपरिषद

१६

बल्लारपूर नगरपरिषद

४५

कुरूंदवाड नगरपरिषद

१७

भामरागड नगरपंचायत

४६

लोणावळा नगरपरिषद

१८

ब्रम्हपुरी नगरपरिषद

४७

महाबळेश्वर- गिरीस्थान नगरपरिषद

१९

देसाईगंज नगरपरिषद

४८

मलकापूर नगरपरिषद

२०

धानोरा नगरपंचायत

४९

मंगळवेढा नगरपरिषद

२१

कामठी नगरपरिषद

५०

मुरगुड नगरपरिषद

२२

काटोल नगरपरिषद

५१

पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद

२३

खापा नगरपरिषद

५२

पन्हाळा नगरपरिषद

२४

कोरपना नगरपंचायत

५३

रहिमतपूर नगरपरिषद

२५

महादुला नगरपंचायत

५४

सासवड  नगरपरिषद

२६

मौदा नगरपंचायत

५५

शिरूर  नगरपरिषद

२७

मोवाड नगरपरिषद

५६

वडगांव नगरपरिषद

२८

नरखेड नगरपरिषद

५७

विटा नगरपरिषद

२९

सावली नगरपंचायत

५८

वाई नगरपरिषद