Wednesday, 23 February 2022

राजधानीत संत गाडगेबाबा जयंती साजरी







नवी दिल्ली ,दि. 23 : क्रातिकारी संत व थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीर कुमार बिस्वास यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त तथा सचिव डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगेबाबांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगेबाबांची जयंती साजरी करण्यात आली.परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित कार्यालयातील कर्मचा-यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र. 38/ दि.23.02.2022


 

Monday, 21 February 2022

Centre To Soon Accord ‘Classical Language Status’ To Marathi -Marathi Language Minister, Subhash Desai







New Delhi, 21: “Marathi Language qualifies all parameters as required for accordance of classical status, and the Union Government will accord the classical Language Status to Marathi sooner, expressed the State Language Minister, Subhash Desai.  He was in the Capital to meet the Union Culture Minister, G. Kishan Reddy.

 

The Minister met Union Minister G Kishan Reddy in Delhi at Transport Bhawan, with a demand to grant classical language status to Marathi.  Principal Secretary for Marathi Language, Bhushan Gagrani, Eminent Marathi writer and Director, Shrirang Godbole and other Senior officers were present.

Shri Desai urged the Union Minister to accord classical status to Marathi in the wake of ‘Marathi Bhasha Gaurav Din’ which is celebrated on February 27th every year. This day is celebrated in the honour and birth anniversary of eminent veteran Litterateur, Shri Vi.Va. Shirwadkar. Shri Desai deliberated on the issue and urged the Union Minister to accord Classical Status to Marathi Language, as it complies and fulfils all the required parameters and criteria for any language to be accorded a Classical Language status. During this meeting, the State Minister also invited Shri Reddy to Mumbai and announce the same on February 27th. Adding further, he said that, this announcement will infuse happiness across the state having 13 crore population.

The Union Minister assured that the process is under active consideration and a positive decision in this regards will be announced sooner. Shri Desai underlined that the State Government is pursuing for this issue since 2013. The Literature Academy and the linguistic expert committee accepted that it is appropriate to bestow Marathi Language with the classical language status, he added further.

The Union Minister assured that a positive decision in this matter will be taken by the Prime Minister, Shri Narendra Modi and Home Minister, Shri Amit Shah. Adding further, he said that the Union Government is very positive to grant Classical Status to Marathi.

            After this meeting, Shri Desai held a meeting with all the representatives of the Marathi Mandals located in Delhi and NCR region and various eminent Marathi personalities putting up in Delhi. As short film on ‘Shantata ! Marathiche Court Suru Aahe’ was presented during this time.  The Minister sought various suggestions from them to expedite this proposal.

Immediately after, Shri Desai addressed a press conference and informed the media persons about the deliberations held during the meeting. He informed that so far only six languages have been bestowed with this status officially – Sanskrit, Tamil, Malayalam, Kannada, Telugu and Odiya based on various parameters. He further added that, a high-level Committee of language experts was appointed under Shri Rangnath Pathare, a senior Marathi litterateur.  He added, ‘Marathi is not only an ancient language but also the state language, used by litterateurs, intellectuals, by people of common masses and ranks among the major languages in the world, added the Minister.

The move came a day after Maharashtra the Chief Minister, Shri Uddhav Thackeray dispatched a second set of postcards to President Ramnath Kovind seeking classical language status for Marathi under the JanAbhiyan drive initiated in the State. A total of 1,20,000 postcards have been sent to the President so far.

 

                                                    *****************

Engnews/A.K.Arora

 

 


 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासन सकारात्मक- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई






नवी दिल्ली ,21 : अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लागणारे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत असून केंद्र सरकार मराठीला अभिजात दर्जा देण्याविषयी सकारात्मक असल्याची माहिती, राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली .

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात श्री देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.किशन रेड्डी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यावेळी उपस्थित होते. मराठीला अभिजात दर्जा देण्‍याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीच शंका व्यक्त करण्यात आलेली नाही. या विषयासंदर्भात राज्य शासनाच्यावतीने आवश्यक सर्व पुरावे देण्यात आल्याने आता कोणतीही अडचण राहिली नाही. मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनीही आज सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्याचे आवाहन केंद्र शासनाकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा या गौरवपूर्ण भाषेचा हक्क असल्याचे सांगून याबाबत राज्य शासन कोणत्याही भौतिक लाभाचा विचार करीत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिल्लीतील मराठी संस्थाचे प्रतिनिधी व मराठी अधिकाऱ्यांसोबत बैठक

केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात दिल्लीतील मराठी संस्था व मराठी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचे श्री देसाई यांनी सांगितले. याबैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणा-या अभियानाची माहिती दिल्याचे व उपस्थितांची मत जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीर कुमार बिस्वासही उप‍स्थित होते.

अभिजात दर्जा मिळण्याबाबत राज्यशासनाचे काटेकोर प्रयत्न
मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या प्रयत्नांविषयी श्री देसाई यांनी यावेळी माहिती दिली.वर्ष 2013 पासून याबाबत प्रयत्न सुरु असून राज्य शासनाने साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात मराठी भाषेला 2 हजार वर्षांचा इतिहास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मराठी भाषा प्राचीन असून या भाषेत सतत श्रेष्ठ दर्जाची वाड्मय निर्मिती होत राहिली आहे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकषही मराठी भाषा पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्यातील जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी ‘शातंता ! मराठीचं कोर्ट चालू आहे’ हा लघुपट तयार करण्यात आला. नुकतेच नाशिक येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात आणि विधिमंडळात हा लघुपट प्रसारित करण्यात आला. तसेच,मराठी भाषेची प्राचीनता दर्शविणाऱ्या साहित्यिक संदर्भांची प्रदर्शनी लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबात प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आदिंच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसांपासून राज्यभर अभियान सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्यातील साहित्यिक, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राष्ट्रपतींना पोस्ट कार्ड लिहिली आहेत. जनतेनी लिहिलेली जवळपास 1 लाख 20 हजार पोस्टकार्ड राष्ट्रपतींना पाठविण्यात आली. यातील एक खेप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित रविवारी पाठविण्यात आली आहे. या उपक्रमार्फत जनभावनेची राष्ट्रपतीन नक्कीच दखल घेतील व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देतील असा विश्वासही श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेस मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद गवादे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, ज्येष्ठ कलाकार व दिग्दर्शक श्रींरंग गोडबोले उपस्थित होते. दिल्लीतील मराठी संस्था व मराठी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तसेच पत्रकार परिषदेत ‘शातंता ! मराठीचं कोर्ट चालू आहे’ हा लघुपट प्रसारित करण्यात आला.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र. 37/ दि.21.02.2022


 

मराठी भाषा गौरव दिनी ‘मराठी’ ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

 


केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिले सकारात्मक आश्वासन

 

नवी दिल्ली , 21 : महाराष्ट्रमध्ये कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरी केली जाती. याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मराठी भाषा मंत्री  सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय सांस्कृत‍िक मंत्री जी किशन रेड्डी यांना भेटून केली.

 

येथील परिवहन भवनमध्ये श्री देसाई यांनी श्री रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, अभिनेते,निर्माते आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

श्री देसाई यांनी मराठी भाषा ही अभिजात आहे या विषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच मराठी भाषेबद्दल सुलभ संदर्भ म्हणून आतापर्यंत झालेल्या वाटचालीची पुस्तिका, आणि निवेदन केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांना द‍िले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतचे सर्वच निकष, अटींचे पालन केले असल्याचे केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांनी सांगितले. यासोबत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय  गृहमंत्री अमीत शहा यांचेही याबाबत सकारात्मक दृष्टीकोण असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  केंद्र सरकार यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घेणार असल्याचे श्री रेड्डी यावेळी म्हणाले.

 

        श्री देसाई यांनी केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांना कुसूमाग्रज जयंती निमित्त साजरा केला जाणा-या मराठी भाषा गौरव दिनाला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. याच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची घोषणाही करण्याची मागणी केली. यामुळे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला आनंद होईल, असे श्री देसाई यावेळी म्हणाले.

 

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जनअभियानाचे रूप आले असल्याचे सांगुन श्री देसाई म्हणाले, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले असल्याची माहिती श्री रेड्डी यांना दिली.

यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हजारो पोस्ट कार्डसच्या माध्यामातूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्राच्या कान्याकोप-यातून पाठविली असल्याचे श्री देसाई यांनी माहिती दिली.

Sunday, 20 February 2022

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी



नवी दिल्ली , 20 : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी  करण्यात आली.  

             कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त व सचिव डॉ. निधी पांडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

                                 0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic

 वि.वृ.क्र.35/दि.20.02.2022

 

Friday, 18 February 2022

‘जय जय जय शिवाजी ’ च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले शिवजयंती उत्साहात साजरी















 

नवी दिल्ली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील ढोल-ताशांचे दिमाखदार सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फुर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला.

शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने  येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. भव्य महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी  कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज्ञी राजे संयोगिता राजे छत्रपती ,युवराज राजे शहाजी राजे छत्रपती  यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर पालखी पुजन करण्यात आले.  

महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी  स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयाला छत्रपती परिवारातील सदस्य, खासदार सदाशिवराव लोखंडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर कुमार बिस्वास, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ. निधी पांडे, महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण

ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातारवण निणादून गेले होते.  नाशिक येथील 30 वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला.

                      संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

तत्पूर्वी, सकाळी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले.यावेळी युवराज राजे शहाजी राजे छत्रपती, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

                                                             0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार/वि.वृ.क्र.3/दि.19.02.2022

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार : २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाद



नवी दिल्ली, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 अशी होती. आता पुन्हा 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाद देण्यात आलेली आहे, तरी अधिकाअधिक पत्रकारांनी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, तसेच दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहेत पुरस्कारांची माहिती अ.क्र पुरस्काराचे नाव पारितोषिक 1 बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 2 अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 3 बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 4 मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 5 यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 6 पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 7 तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 8 केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 9 समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 10 स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 11 पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) विभागीय पुरस्कार 12 दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) 13 अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 14 आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 15 नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 16 शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 17 ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग 51 हजाररुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 18 लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 19 ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत नियम व अटी राज्य / विभागीय पुरस्कार पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील पाच वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे. उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या दोन प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल. पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील. ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल. जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखण अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील. गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय मुंबई-32 येथे पाठवाव्यात. शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधी विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील. 2021 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे. तसेच, कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. विकास योजना संदर्भातील समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार केंद्र शासनाचे “स्वच्छ भारत अभियान” आणि राज्य शासनाचे “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी “पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार” देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), यांच्या नावाने मुंबई येथील मुख्यालयातील पत्त्यावर पाठवावे. छायाचित्रकार पुरस्कार “तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार” स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार विविध विकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे. प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे. इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील. 00000

Wednesday, 16 February 2022

दिल्लीतील पत्रकारितेत महाराष्ट्र परिचय केंद्राची उत्तम साथ- ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर

नवी दिल्ली , १६ : दिल्लीतील पत्रकारितेच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात महाराष्ट्र परिचय केंद्राची उत्तम साथ लाभली, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी आज येथे व्यक्त केल्या. दैनिक सकाळच्या दिल्ली ब्युरो कार्यालयाचे वृत्तविभाग प्रमुख म्हणून श्री.बागाईतकर सेवानिवृत्त झाले या पार्श्वभूमीवर परिचय केंद्रात त्यांचा छोटेखाणी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते. दिल्लीत काम करतांना मराठी पत्रकारांना महाराष्ट्र परिचय केंद्राचा मोठा आधार असतो. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत परिचय केंद्राची खूप मदत झाली व या केंद्राने उत्तम सहकार्य केल्याची भावना श्री. बागाईतकर यांनी व्यक्त केली. पत्रकारितेच्या विविध टप्प्यांवर अनुभवलेली दिल्ली तसेच येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, साहित्यिक अशा विविध पैलूंचा केलेला अभ्यास व प्रत्यक्ष कामाचा अनुभव, अशा विविध आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. अनंत बागाईतकर यांच्या प्रत्रकारितेतील प्रवासाविषयी श्री बागाईतकर हे गेल्या ४० वर्षांपासून सक्रीय पत्रकारितेत आहेत. पत्रकारितेची पदवी संपादन करून पुण्यातील ‘दैनिक केसरी’ वृत्तपत्रातून डिसेंबर १९७९ मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. १९८६ मध्ये ‘दैनिक केसरी’चे दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. १९८९-९४ दरम्यान त्यांनी ‘जन्मभूमी’ या गुजराती वृत्तपत्र समुहासाठीही दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले. १९९४ पासून त्यांनी दैनिक सकाळच्या दिल्ली ब्युरो कार्यालयात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्याला सुरुवात केली व या कार्यालयात ते गेल्या १० वर्षांपासून वृत्तविभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत ‍होते.‘माध्यमे आणि राजसत्ता’ ही त्यांची पुस्तिका प्रकाशित आहे. दिल्ली आकाशवाणी, लोकसभा टिव्ही, राज्यसभा टिव्ही, एनडी टिव्ही आदींवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा सहभाग राहिला. वर्ष २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुककाळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरून या निवडणुकांचे विश्लेषण केले. त्यांनी २०१८-१९ मध्ये प्रेस क्लब ऑफ इंडिया या पत्रकारितेतील नामांकित संस्थेचे अध्यक्ष तर २०१९-२० मध्ये महासचिव पद भूषविले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या माध्यम सल्लागार समितीवर त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे. माजी लोकसभा अध्यक्ष दिवंगत सोमनाथ चटर्जी यांच्या कार्यकाळात त्यांनी या समितीचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.मागील काही वर्षांपासून श्री.बागाईतकर यांनी राज्यसभेच्या माध्यम सल्लागार समितीचे सचिवपदही भूषविले. 0000 आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic रितेश भुयार/ वि.वृ.क्र. 32/ दि.16.02.2022

राजधानीत संत रविदास महाराजांची जयंती साजरी






                   

नवी दिल्ली , 16 : संत रविदास महाराज यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.  

             कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी  आयुक्त  तथा प्रधान सचिव समीर कुमार बिस्वास  यांनी  संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त व सचिव डॉ. निधी पांडे,अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे,सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी   कर्मचाऱ्यांनी  संत रविदास महाराजांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

                  महाराष्ट्र परिचय केंद्रात संत रविदास महाराजांना अभिवादन                

                  महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत रविदास महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.                           

                                                         0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार/ वि.वृ.क्र. 31/ दि.16.02.2022