Monday, 30 November 2015

वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांना जी फाईल्स ‘जीवन गौरव’ पुरस्कार

           

नवी दिल्ली, दि. ३०: जी फाईल्स या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील तीन प्रशासकीय अधिका-यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

            नागरी सेवा अधिकारी संस्थेत शनिवारी  केंद्रीय खान व स्टील मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रसिध्द वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांना संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाचे अभियंता विभागाचे प्रभारी अजय सिंघल यांना असाधारण योगदान पुरस्कार ,जलसंपदा आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आणि विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांना उत्कृष्ट योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, हरियाणा राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यावेळी उपस्थित होते. प्रशासकीय सेवेत कार्यरत देशातील विविध राज्यात उत्तम कार्य करणा-या प्रशासकीय अधिका-यांच्या कामाचे मुल्यमापन करून त्यांना गौरविण्याचे कार्य जी फाईल्स ही संस्था करीत आहे.

            डॉ. अनिल काकोडकर यांनी भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात आणि विशेषत:  आण्वीक संशोधन कार्यात दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अजय सिंघल यांनी  उत्तम स्पेक्ट्रम नियंत्रण आणि परवान्यांसाठी पारदर्शी पध्दतीचा अवलंबकरून नियम उल्लंघ नकरता राबविलेल्या उपग्रह स्पेक्ट्रम यंत्रणेसाठी गौरविण्यात आले. शेती पिक किटक नियंत्रण यंत्रणेचा प्रभावीपणे अवलंब करून शेती व ई- प्रशासन व्यवस्थेत दिलेल्या अमुल्य योगदानासाठी प्रभाकर देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.  मुंबई शहरातून अंडरवर्ल्डच्या कारवायांना चाप बसविणे आणि या शहरातील स्कँडल उघड करण्याच्या महत्वपूर्ण योगदानासाठी मीरा बोरवणकर यांना गौरविण्यात आले.
            केंद्र सरकारचे माजी कॅबीनेट सचिव प्रभात कुमार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधे केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव अनील राझदान, हरियाणाचे माजी मुख्य सचिव विष्णू भगवान आणि  केंद्र सरकारच्या आंतरिक सुरक्षा विभागाचे माजी सचिव एम.बी.कौशल यांचा समावेश होता.                                                       

                                                                     00000000

Thursday, 26 November 2015

खासदार रक्षा खडसे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रदर्शनास भेट


     
नवी दिल्ली, दि.26: प्रगती मैदानावर सुरू असलेल्या 35 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनास आज खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राने प्रदर्शित केलेल्या राज्य शासनाच्या वर्षपूर्ती प्रदर्शनाचे त्यांनी यावेळी अवलोकन केले.

            गेल्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयावर आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीवर आधारीत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रदर्शनाचे खा.खडसे यांनी कौतुक केले.
            या प्रदर्शनीचे उदघाटन उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई,सर्वश्री खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आनंदराव अडसुळ यांनी याप्रदर्शनीस भेट दिली आहे. तसेच थाई शिष्टमंडळानेही प्रदर्शनीस भेट दिली आहे. महाराष्ट्र दालनास भेट देणारे गुंतवणूकदार, व्यापारी, ग्राहक आणि सर्वसामान्य जनतेनेही या प्रदर्शनास उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 14 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या व्यापार मेळयाचा  दिनांक 27 नोव्हेंबर रोजी समारोप होत आहे.        

                                                        00000000
सूचना : सोबत फोटो जोडला आहे.



एमपीएससी परिक्षाओंकी समय सूची जारी





महाराष्ट्र लोकसेवा आयोग के वर्ष 2016 स्पर्धा परीक्षांओं की समय सूची जारी
संघ लोकसेवा आयोग के साथ अन्य स्पर्धा परिक्षायें भी दे पायेंगे उमीदवार
नई दिल्ली, 26 :  महाराष्ट्र लोक सेवा आयोग की ओर से वर्ष 2016 के अंदाजित स्पर्धा परिक्षाओं की समय सूची जारी की गई है.  इसमें संघ लोक सेवा आयोग, कर्मचारी चयन आयोग, विविध विश्वविद्यालय, परीक्षा लेने वाली अन्य संस्थायें आदी की ओर से लि जाने वाली परीक्षाओं को ध्यान मे रखते हुयें  परीक्षा देनेवाले उमीदवारों का नुकसान न हो एैसी  समय सूची बनाई जारी की गई है.
            महाराष्ट्र लोकसेवा आयोग की परीक्षायें तथा अन्य महत्वपुर्ण परीक्षायें एक ही दिन होने से उमीदवारों का नुकसान होता है इस विषय पर विधानमंडल मे अनेकोबार चर्चा की गई है. इसके मद्दे नजर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ने वर्ष  2016  की समय सूची जारी करते वक्त इन बातो का ध्यान रखा है.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) की ओर से वर्ष 2016  मे अंदाजित समय सूची www.mpsc.gov.in   वेबसाईट पर प्रसिद्ध की है.





वर्ष 2016 मे  विविध पदो की भरती के लिए अंदाजित स्पर्धा परीक्षाओं की समय सूची

अ.क्र.

परीक्षाओं का नाम

विज्ञापन

पूर्व परीक्षा दिनांक

पूर्व परीक्षा का कालावधी

मुख्य परीक्षा दिनांक

मुख्य परीक्षों का  कालावधी
1
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2015
12 अगस्त, 2015
25.10.2015 (रविवार)
1 दिन
9 व 10.1.2016 (शनिवार व रविवार)
2 दिन
2
राज्य सेवा परीक्षा 2016
दिसंबर, 2015
10.4.2016 (रविवार)
1 दिन
24, 25 व 26.9.2016 (शनिवार, रविवार व सोमवार)
3 दिन
3
तकनिकी सहायक परीक्षा 2016
दिसंबर, 2015
----
----
6.3.2016 (रविवार)
1 दिन
4
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2016
जनवरी, 2016
3.4.2016 (रविवार)
1 दिन
14.8.2016
1 दिन
5
लिपिक- टंक लेखक परीक्षा 2016
मार्च, 2016
----
----
8.5.2016
1 दिन
6
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2016
मार्च, 2016
22.5.2016 (रविवार)
1 दिन
24 व 25.9.2016 (शनिवार व रविवार)
2 दिन
7
दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2016
मार्च, 2016
5.6.2016 (रविवार)
1 दिन
9.10.2016 (रविवार)
1 दिन
8
कर सहायक परीक्षा 2016
अप्रेल, 2016
-----
-----
17.7.2016 (रविवार)
1 दिन
9
पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2016
अप्रेल, 2016
-----
-----
24.7.2016 (रविवार)
1 दिन
10
सहायक परीक्षा 2016
अप्रेल, 2016
31.7.2016 (रविवार)
1 दिन
6.11.2016 (रविवार)
1 दिन
11
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2016
अप्रेल, 2016
10.7.2016 (रविवार)
1 दिन
18.12.2016 (रविवार)
1 दिन
12
पोलीस उप निरीक्षक परीक्षा 2016
मई, 2016
28.8.2016 (रविवार)
1 दिन
11.12.2016 (रविवार)
1 दिन
13
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2016
जून, 2016
21.8.2016 (रविवार)
1 दिन
27.11.2016 (रविवार)
1 दिन
14
विक्रीकर निरीक्षक परीक्षा 2016
जुलैई, 2016
16.10.2016 (रविवार)
1 दिन
फरवरी, 2017
1 दिन
15
विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2016
अगस्त, 2016
-----
-----



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2016 स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर



     उमेदवारांना संघ लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परिक्षाही देता येणार

नवी दिल्ली, 26 :  महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे सन २०१६ मध्ये आयोजित स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  संघ लोक सेवा आयोग, इतर लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परिक्षा घेणा-या इतर संस्था इत्यादिंकडून आयोजित करण्यात येणा-या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन उमेदवाराचे नुकसान होणार नाही यादृष्टीने हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 
            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा आणि इतर स्पर्धा परिक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही याबाबत विधिमंडळात अनेकवेळा चर्चा झाली आहे. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे वेळापत्रक तयार केले आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन 2016 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक www.mpsc.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
            सन 2016 मध्ये विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे :

अ.क्र.

परीक्षेचे नाव

जाहिरात

पूर्व परीक्षा दिनांक

पूर्व परीक्षेचा कालावधी

मुख्य परीक्षा दिनांक

मुख्य परीक्षेचा कालावधी
1
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2015
12 ऑगस्ट, 2015
25.10.2015 (रविवार)
1 दिवस
9 व 10.1.2016 (शनिवार व रविवार)
2 दिवस
2
राज्य सेवा परीक्षा 2016
डिसेंबर, 2015
10.4.2016 (रविवार)
1 दिवस
24, 25 व 26.9.2016 (शनिवार, रविवार व सोमवार)
3 दिवस
3
तांत्रिक सहायक परीक्षा 2016
डिसेंबर, 2015
----
----
6.3.2016 (रविवार)
1 दिवस
4
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2016
जानेवारी, 2016
3.4.2016 (रविवार)
1 दिवस
14.8.2016
1 दिवस
5
लिपिक-टंकलेखक परीक्षा 2016
मार्च, 2016
----
----
8.5.2016
1 दिवस
6
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2016
मार्च, 2016
22.5.2016 (रविवार)
1 दिवस
24 व 25.9.2016 (शनिवार व रविवार)
2 दिवस
7
दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2016
मार्च, 2016
5.6.2016 (रविवार)
1 दिवस
9.10.2016 (रविवार)
1 दिवस
8
कर सहायक परीक्षा 2016
एप्रिल, 2016
-----
-----
17.7.2016 (रविवार)
1 दिवस
9
पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2016
एप्रिल, 2016
-----
-----
24.7.2016 (रविवार)
1 दिवस
10
सहायक परीक्षा 2016
एप्रिल, 2016
31.7.2016 (रविवार)
1 दिवस
6.11.2016 (रविवार)
1 दिवस
11
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2016
एप्रिल, 2016
10.7.2016 (रविवार)
1 दिवस
18.12.2016 (रविवार)
1 दिवस
12
पोलीस उप निरीक्षक परीक्षा 2016
मे, 2016
28.8.2016 (रविवार)
1 दिवस
11.12.2016 (रविवार)
1 दिवस
13
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2016
जून, 2016
21.8.2016 (रविवार)
1 दिवस
27.11.2016 (रविवार)
1 दिवस
14
विक्रीकर निरीक्षक परीक्षा 2016
जुलै, 2016
16.10.2016 (रविवार)
1 दिवस
फेब्रुवारी, 2017
1 दिवस
15
विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2016
ऑगस्ट, 2016
-----
-----
< 


                                                                             00000