नवी दिल्ली, दि. ३०: ‘जी
फाईल्स’ या संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील तीन प्रशासकीय अधिका-यांना
उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ वैज्ञानिक
डॉ. अनिल काकोडकर यांना ‘जीवन गौरव’
पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
नागरी सेवा
अधिकारी संस्थेत शनिवारी केंद्रीय खान व
स्टील मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रसिध्द वैज्ञानिक डॉ. अनिल
काकोडकर यांना संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र
शासनाच्या जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाचे अभियंता विभागाचे
प्रभारी अजय सिंघल यांना ‘असाधारण योगदान पुरस्कार’ ,जलसंपदा आणि रोजगार हमी
योजना विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आणि विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा
बोरवणकर यांना ‘उत्कृष्ट योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, हरियाणा राज्याचे
अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यावेळी उपस्थित होते. प्रशासकीय सेवेत कार्यरत देशातील
विविध राज्यात उत्तम कार्य करणा-या प्रशासकीय अधिका-यांच्या कामाचे मुल्यमापन करून
त्यांना गौरविण्याचे कार्य ‘जी फाईल्स’
ही संस्था करीत आहे.
डॉ. अनिल
काकोडकर यांनी भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात आणि विशेषत: आण्वीक संशोधन कार्यात दिलेल्या योगदानासाठी
त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अजय सिंघल यांनी उत्तम स्पेक्ट्रम नियंत्रण आणि परवान्यांसाठी
पारदर्शी पध्दतीचा अवलंबकरून नियम उल्लंघ नकरता राबविलेल्या उपग्रह स्पेक्ट्रम
यंत्रणेसाठी गौरविण्यात आले. शेती पिक किटक नियंत्रण यंत्रणेचा प्रभावीपणे अवलंब
करून शेती व ई- प्रशासन व्यवस्थेत दिलेल्या अमुल्य योगदानासाठी प्रभाकर देशमुख
यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई शहरातून
अंडरवर्ल्डच्या कारवायांना चाप बसविणे आणि या शहरातील स्कँडल उघड करण्याच्या
महत्वपूर्ण योगदानासाठी मीरा बोरवणकर यांना गौरविण्यात आले.
केंद्र सरकारचे
माजी कॅबीनेट सचिव प्रभात कुमार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधे केंद्रीय
ऊर्जा विभागाचे सचिव अनील राझदान, हरियाणाचे माजी मुख्य सचिव विष्णू भगवान
आणि केंद्र सरकारच्या आंतरिक सुरक्षा
विभागाचे माजी सचिव एम.बी.कौशल यांचा समावेश होता.
00000000
No comments:
Post a Comment