नवी दिल्ली, दि.26:
प्रगती मैदानावर सुरू असलेल्या 35 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार
मेळयातील महाराष्ट्र दालनास आज खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली. महाराष्ट्र
परिचय केंद्राने प्रदर्शित केलेल्या राज्य शासनाच्या वर्षपूर्ती प्रदर्शनाचे
त्यांनी यावेळी अवलोकन केले.
गेल्या वर्षभरात
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयावर आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी
योजनांच्या अंमलबजावणीवर आधारीत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रदर्शनाचे खा.खडसे
यांनी कौतुक केले.
या प्रदर्शनीचे
उदघाटन उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. उद्योगमंत्री
सुभाष देसाई,सर्वश्री खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आनंदराव अडसुळ यांनी
याप्रदर्शनीस भेट दिली आहे. तसेच थाई शिष्टमंडळानेही प्रदर्शनीस भेट दिली आहे.
महाराष्ट्र दालनास भेट देणारे गुंतवणूकदार, व्यापारी, ग्राहक आणि सर्वसामान्य
जनतेनेही या प्रदर्शनास उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 14 नोव्हेंबर पासून सुरू
झालेल्या या व्यापार मेळयाचा दिनांक 27
नोव्हेंबर रोजी समारोप होत आहे.
00000000
सूचना :
सोबत फोटो जोडला आहे.
No comments:
Post a Comment