Thursday, 19 November 2015

खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रदर्शनास भेट


     
नवी दिल्ली, दि.19: प्रगती मैदान येथे आयोजित 35 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनास खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राने प्रदर्शित केलेल्या प्रदर्शनासही भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.
     
मेक-इन-इंडिया’ च्या मध्यवर्ती संकल्पनेवर मेक-इन-महाराष्ट्र प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन गुंतवणूकदार व शिष्टमंडळाचे आकर्षण ठरत आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्र दालनाला भेट देणा-यांच्या संख्येत वाढ होत आहे.
     

14 नोव्हेंबर ला व्यापार मेळयाचे उदघाटन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते झाले. यापुर्वी खासदार विनायक राऊत, थाई शिष्टमंडळ, देशी-विदेशी गुंतवणूकदार, व्यापारी, सामान्य जनता यांनाही परिचय केंद्राच्या प्रदर्शनास भेट दिली आहे. 




No comments:

Post a Comment