नवी दिल्ली, दि. १८ :महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने फेब्रुवारी-2016 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क कार्यशाळेच्या बोधचिन्हाचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या हस्ते नागपूर येथे आज करण्यात आले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दरवर्षी शासनातील जनसंपर्क या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही कार्यशाळा दि. 15 ते 18 फेब्रुवारी 2016 या कालवधीत येथील गांधी स्मृती व दर्शन समिती राजघाट येथे आयेाजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेच्या बोधचिन्हाचे आज महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी संचालक शिवाजी मानकर, नागपूर विभागाचे संचालक मोहन राठोड, महाराष्ट्र परिचय केंद्रांचे उपसंचालक दयानंद कांबळे उपस्थित होते.या कार्यशाळेत महाराष्ट्रसह देशातील सर्व राज्यांचे माहिती व जनसंपर्क विभागाचे 40 वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेत जनसंपर्क अधिकाऱ्यांना जनसंपर्कातील नवे प्रवाह व प्रतिमा निर्मिती याचे प्रशिक्षण देण्यात येते.
गेल्या वर्षी या कार्यशाळेत देशभरातील 35 अधिकारी उपस्थित होते.
फेब्रुवारी 2016 मध्ये होणाऱ्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राची वेबसाईट, मोबाईल ॲप व विविध भारतीय भाषांमधील महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख दर्शविणाऱ्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
०००००
No comments:
Post a Comment