नवी
दिल्ली, दि. 28 : महाराष्ट्रातील जालना, नांदेड आणि रायगड या
जिल्हयांना आज डिजीटल इंडिया पुरस्कार केंद्रीय संचार आणि माहिती तंत्रज्ञान
मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
येथील
इंडिया हॅबीटेट सेंटरच्या स्टेन सभागृहात भारत सरकारच्या संचार व माहिती
तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ‘गुड गव्हर्न्स डे’च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या
कार्यक्रमामध्ये ज्या जिल्हयांनी डिजीटल इंडिया आठवडया दरम्यान उत्कृष्ट कार्य
केले त्यांना पुरस्कृत करण्यात आले. 1 ते 7 जुलै 2015 दरम्यान डिजीटल इंडिया आठवडा
घोषीत करण्यात आला होता. यामध्ये जालना जिल्हयाला प्रथम पुरस्कार मिळाला. जिल्हाधिकारी
ए.एस.आर.नायक यांनी पुरस्कार स्वीकारला, नांदेड जिल्ह्याला व्दितीय पुरस्कार
मिळाला. जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी पुरस्कार स्वीकारला. रायगड जिल्ह्याला तीसरा पुरस्कार मिळाला. जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना पुरस्कार
स्वीकारला.
1
ते 7 जुलै 2015 दरम्यान केंद्र शासनाने घोषीत केलेल्या डिजीटल इंडिया आठवडयामध्ये प्रत्येक
दिवशी नवीन कार्यक्रम हातात घेऊन प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेवीका,
परिचारीका, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हयामधील प्रत्येक कुटूंबातील एका व्यक्तीला ई-साक्षर
करण्यात आले. डीजीटल लॉकर बनविण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले, महाऑनलाईन, महा-ई-सेवा,
जीवन प्रामण प्रणाली, आधारव्दारे बायोमॅट्रीक अटेंडन्स आणि अन्य प्रणालींचे
प्रशिक्षण देण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment