नवी दिल्ली, दि. ७: मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने
आयोजित कला उत्सवासाठी महाराष्ट्रातील ४१ शालेय विद्यार्थ्यांचा संघ दिल्लीत डेरे
दाखल झाला आहे.
येथील राष्ट्रीय बालभवनात दिनांक ८ ते १० डिसेंबर
दरम्यान‘कला उत्सवा’चे
आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या विविध राज्यांतून या उत्सवात सहभागी होण्यासाठी
शालेय विद्यार्थी दाखल झाले आहेत. राज्याच्या विद्यार्थी विकास विभागाच्या उपसचिव
तथा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या राज्यातील प्रकल्प संचालक डॉ. सुवर्णा
खरात, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे समन्वयक तथा प्रसिध्द लोकशाहीर संभाजी
भगत, कार्यक्रम अधिकारी सलील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील १६
विद्यार्थीनी व २३ विद्यार्थी अशा एकूण ४१
शालेय विद्यार्थ्यांचा संघ या उत्सवासाठी दिल्लीत दाखल झाला आहे.
लोकशाहीर
संभाजी भगत यांनी सांगितले , ‘कला उत्सवा मागचा मूळ
हेतू भारतीय समाजातील तळागाळातील मानव
समुहांच्या लोककला आणि त्यांचे आदिम तंत्रज्ञानातील योगदानाची माहिती
विद्यार्थ्यांना मिळावी तसेच त्यांच्या बद्दल
सन्मानाची आणि सदभावाची भावना जागृत व्हावी असा आहे.’
राज्यातून लोककेलेचे तीन प्रकार सादर करण्यात येणार आहेत. यात लोकनाटय, लोक नृत्य
आणि पोवाळा हा लोक संगीताचा प्रकार सादर केले जाणार आहेत. यासोबतच दृष्यकला
प्रकारात महाराष्ट्रातील मातीकलेचे सादरीकरणही होणार आहे.’ दिनांक
८ डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते या उत्सवाचे उदघाटन होणार आहे.
०००००
No comments:
Post a Comment