केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण
मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शारीरिक असक्षमीकरण दिनाचे औचित्य साधून विज्ञान
भवनात शारीरिक असक्षम राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते
विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्थांचा राष्ट्रीय
पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण
मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री
द्वय कृष्णपाल सिंह आणि विजय सांपला
उपस्थित होते.
कर्ण बधिरांच्या
स्वयंरोजगार गटात वैयक्तीक पुरस्कार पुण्याच्या नेहा कुलकर्णीला प्रदान करण्यात
आला. मंतीमंदाच्या गटात मुंबईच्या समीर दार्जी यांना सन्मानीत करण्यात आले.
अपंगाच्या आदर्श व्यक्ती गटाच्या कर्णबधीर या उपगटात पुण्याच्या
प्रेरणा सहाणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र
शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी राज्य शासनाला मिळालेला सर्वोत्तम संकेतस्थळाचा
पुरस्कार स्वीकारला. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम संकर नारायणन यांच्या
मार्गदर्शनाखाली हे संकेत स्थळ तयार करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठात कार्यरत प्राध्यापक व स्वत:
शारीरिक असक्षम असलेले धंनजय भोये यांचा संकेतस्थळ निर्मिती कार्यात सहभाग होता.
शारीरिकदृष्टया असक्षम व्यक्तींनाही शासन
निर्णय व संकेतस्थळावरील महत्वाची माहिती सुगम रित्या कळावी यासाठी ब्रेल लिपीसह
ऑडीओ –व्हीडीओ क्लीप देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्ग
निर्देर्शीत करण्याची व्यवस्थाही या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या
संकेतस्थळावरील मुख्यपानावर बटन देण्यात आले आहे ज्यामुळे अपंगांनाही फॉन्ट साईज
आणि रंगसंगती समजून घेण्यासाठी मदत होते. सुगम डाटा टेबल व छायाचित्र व्यवस्था
उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचे नियंत्रण बटनद्वारे सहजगत्या नियंत्रित
करण्यात येते. हे संकेतस्थळ बहुभाषी
सुविधांसहीत स्मार्ट फोन व संगणकावर सहजगत्या वापरता येऊ शकते.
००००००
No comments:
Post a Comment