नवी
दिल्ली दि. १५ : तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी
महाराष्ट्राला शनिवारी दिनांक १६ जानेवारी २०१६ रोजी सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय
पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्य करणा-या पेट्रोलियम संवर्धन संशोधन
मंडळाच्यावतीने येथील डिआरडीओ भवनात सकाळी १०.३० वा. आयोजित समारंभात केंद्रीय पेट्रोलीयम
व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्राच्या मार्गदर्शनाखाली २०१५ मधे तेल व वायू संवर्धन पंधरवाडया पासून महाराष्ट्रातील
विविध जिल्हयांमधे तेल व वायू संवर्धनाच्या दिशेने कामास सुरुवात झाली. मंत्रालय
आणि जिल्हा स्तरावरील कार्यालयांनी राज्यातील उद्योग, कृषी, वाहतूक, जैव इंधन,
घरगुती वापर आदी क्षेत्रात २०४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविले म्हणून
मोठया राज्यांच्या गटात महाराष्ट्राची सर्वोत्तम राज्य म्हणून निवड करण्यात आली
आहे.
000000
No comments:
Post a Comment