Monday, 25 January 2016

राष्ट्रपतींच्या हस्ते शिरीष मोहोड व शेखर चन्ने यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान




नवी दिल्ली, दि. २५ : महाराष्ट्राच्या स्वीप कार्यक्रमाचे समन्वयक तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड  आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

        केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील मानेकशा सेंटरच्या झोरवार सभागृहात आयोजित ६ व्या राष्ट्रीय निवडणूक मतदातादिनाच्या कार्यक्रमात निवडणूक पध्दतीच्या उत्तम अंमलबाजवणीसाठी विविध राज्यांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी, निवडणूक आयुक्त द्वय ए.के.जोती आणि ओमप्रकाश रावत मंचावर उपस्थित होते.  

 मतदान व्यवस्थापनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वीप कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने २००९ पासून देशातील विविध राज्यात मतदारांना साक्षरकरून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करण्याचा कार्यक्रम’(स्वीप) राबविण्यात येत आहे. श्री. मोहोड आणि श्री. चन्ने  यांनी या कार्यक्रमाच्या तिस-या टप्प्यात वर्ष २०१५ मधे महाराष्ट्रात उत्तम प्रकारे अमंलबजावणी केली आहे. त्यांनी स्वीप कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविला आहे.या कार्यक्रमात महाराष्ट्राशिवाय बिहार, झारखंड, दिल्ली व पश्चिम बंगाल या राज्यांच्या प्रतिनिधींनाही विविध श्रेणींमधे पुरस्कार प्रदान करण्यात आला.                                                                

                                                                     ०००००   

No comments:

Post a Comment