Monday, 25 January 2016

महाराष्ट्रातील दोघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर



                                                                           

नवी दिल्ली, दि. २५ : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील ५० व्यक्तींना  आज जीवन रक्षा पदक पुरस्कारजाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अनुमतीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या जीवन रक्षा पदक पुरस्कार २०१५आज जाहीर करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्रातून सतीश वैजनाथराव आणि  अक्षय आनंद तांबे यांचा जीवन रक्षा पदक पुरस्कार विजेत्यांच्या यादीत समावेश आहे. 

देशातील ५० नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात ३ सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार, ९ उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कारआणि ३८ जीवन रक्षा पदक पुरस्कारआहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर  काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
                                                                     0000




No comments:

Post a Comment