नवी दिल्ली, दि.17 : महाराष्ट्राच्या मराठ मोळया संस्कृतिचे दर्शन
घडवित आज दिल्ली हाट येथे महा-जत्रा या कला-संस्कृति व हस्तकला प्रदर्शनाचे शानदार
उदघाटन झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी दिल्ली हाट चा परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्राची लोकसंस्कृती या सांस्कृतिक कार्यक्रमाने तर देशी-विदेशी पर्यटकांची
मने मराठी माणसाने जिंकून घेतली.
महाराष्ट्राच्या
संस्कृतिची ओळख व्हावी व राज्यातील लघु उद्योजक, हस्तकला कारागीर व कलाकरांना
व्यासपीठ मिळावे या उद्देशाने राजधानी दिल्लीत राज्य शासनाच्या वतीने ‘महा-जत्रा’ या
प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 ते 31 जानेवारी 2016 पर्यंत चालणा-या या
महाजत्रेत महाराष्ट्रातील लघुउद्योजक, हस्तकाला कारगीर, कलाकार यांनी 120 स्टॉल्स उभारले
आहेत. राज्य शासनाचा पर्यटन विभाग, सांस्कृतिक संचालनालय, लघु उद्योग विकास महामंडळ, सांस्कृतिक कार्य संचालनालय
यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यटन
व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सचिव श्रीमती वल्सा आर. नायर सिंह यांच्या
हस्ते ‘महा-जत्रा’ या
प्रदर्शनाचे उदघाटन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून व गणेश
पुजनाने श्रीमती नायर यांनी प्रदर्शनाचे उदघाटन केले. सांस्कृतिक कार्य संचालक अजय
अंबेकर यावेळी उपस्थित होते. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या
परिसराची सजावट केली आहे.
या
महोत्सवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देणारी कार्यशाळा प्रथमच पहायला
मिळणार आहे. महाराष्ट्राची पांरपारिक ओळख वारली चित्रकला, रांगोळी, आदीवासी मुखवटे
तयार करणे, मातीचे किल्ले तयार करणे याबरोबरच नऊवारी साडी नेसणे आदी विषयांवर पर्यटकांसाठी
कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या महाजत्रेत दिवसभर महाराष्ट्राच्या लोककलांचे सादरीकरण
होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरिल महत्वाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक घडामोडीतील
महाराष्ट्राच्या सहभागाची दुर्मिळ कागदपत्रांचे प्रदर्शन व राज्य शासनाची प्रकाशने
या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमाने दिल्लीकरांची मने जिंकली
दिल्लीत सध्या चांगलीच थंडी आहे. अशा थंडीत मर्दानी
खेळ पाहताना अंगावर रोमांच आणि ऊर्जा निर्माण करणारे नृत्य यामुळे दिल्लीकर
सुखावून गेले. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या
मराठमोळया कलाकारांनी कधी अंगावर रोमांच उभे केले तर कधी नाठाळ लावणीने रसिकांना खुलवून टाकले. महाराष्ट्राच्या
लोककलांमधील वासुदेव, व्हलगरी दादा, कोळी नृत्य, मंगळा गौर, दही हंडी, आदी
सादरीकरणाने रसिकांना खिळवून ठेवले. मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिक तर दिल्लीकरांचा
ठेका चुकवणारा ठरला महिलेच्या डोक्यावरील नारळ कु-हाडीने फोडताना पर्यटकांनी श्वास रोघून
धरला होता. बहारदार नृत्य, उत्तम सादरीकरण यामुळे दिल्लीकर सुखावून तर गेलेच परंतु
“जय महाराष्ट्र” गजर करायला मात्र ते विसरले नाहीत.
सुभाष
नागरे यांच्या संकल्पनेतील सांस्कृतिक कार्यक्रमाने मराठी संस्कृतिचे प्रभावी दर्शन
आज दिल्लीत पहावयास मिळाले.
परिचय केंद्राचे
प्रदर्शन
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महा-जत्रा’ च्या निमित्ताने
राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणारे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. लोकराज्य
या शासनाच्या मुखपत्राचा स्टॉलही या ठिकाणी उभारण्यात आला आहे.
|
महा-जत्रेचे क्षण चित्रे
·
स्वागताकरिता समोरील दारावर दोन मोठे हत्तींची
प्रतीकृती
·
दर्शनीय भागावर श्री ची स्थापना
·
छत्रपती महाराजांचा पुर्णाकृती पुतळा
·
जागो जागी महाराष्ट्रातील वस्त्र धारण केलेले जोडपे
·
वासुदेव, वारकरी, आदीवासी ढोल नृत्य, पोडावा सादर करणारे
कलाकार उपस्थित.
·
विविध 120 स्टॉल्स
No comments:
Post a Comment