Thursday, 28 January 2016

‘सोंगी मुखवटा लोकनृत्या’ला प्रथम पुरस्कार






नवी दिल्ली, 28 : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर आयोजित पथसंचलनात शालेय विद्यार्थ्यांव्दारे सादर करण्यात आलेल्या लोकनृत्य श्रेणीत महाराष्ट्रातील सोंगी मुखवटा लोकनृत्याला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारताच्या भुदळ,  नौदळ, वायुदळ, विविध मंत्रालयातर्फे, तसेच विविध राज्यातील चित्ररथ, विविध राज्यातील लोकनृत्य सादर केली जातात. यामध्ये विविध गटातील स्पर्धेचे आयोजनही केले जाते.  विविध राज्यातील लोकनृत्यामध्ये दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्यावतीने सोंगी मुखवटा लोकनृत्य सादर करण्यात आले होते. या नृत्याला शालेय विद्यार्थ्यांच्या श्रेणीतील यंदाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे राजपथावरील पथसंचलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोंगी मुखवटा लोकनृत्याचे छायाचित्र ट्विट केले आहे.

सोंगी मुखवटा लोकनृत्यहे आदिवासी लोकनृत्य आहे. हे लोकनृत्य नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील धाब्याचा पाडा येथील आहे. राजपथावर नृत्य सादर करताना नाशिक येथील स्थानिक कलाकांरानाही भाग घेतला होता. एकूण 166 कलाकारांच्या चमुने राजपथावरील पथसंचलनात सोंगी मुखवटा लोकनृत्य सादर केले होते. 

No comments:

Post a Comment