Saturday 30 January 2016

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली, 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात शनिवारी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, सहायक निवासी आयुक्त अजित सिंग नेगी, यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळली जाते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली

महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळूण आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment