नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्र नॅशनल
कॅडेट कोर्प्स(एनसीसी)ला देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा तिस-या क्रमांचा मान मिळाला आहे. पंतप्रधान बॅनरचा मान ‘पंजाब,चंदीगढ,
हरियाणा व हिमाचल प्रदेश’ या संयुक्त संचालनालयाला तर
उपविजेतेपदाचा मान ‘कर्नाटक व गोवा’ या संयुक्त संचालनालयाला मिळाला आहे.
येथील छावनीभागातील
गॅरीसन परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ‘पंतप्रधान रॅली’ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात
पुरस्कारांची घोषणा व पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री मनोहर
पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह, संरक्षण सचिव जी.मोहन कुमार,
लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंह, वायुसेना प्रमुख एअरचिफ मार्शल अरूप राह, नौसेना
प्रमुख ॲडमीरल आर.के.धवन आणि एनसीसीचे महासंचालक
लेफ्टनंट जनरल अनिरुध्द चतुर्वेदी मंचावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी
या कार्यक्रमात उपस्थित देशभरातील २१०० एनएसएस कॅडेटसना संबोधित केले.ते म्हणाले,
देशात नुकताच प्रजासत्ताक दिन साजरा झाला. स्वतंत्र भारत देशाने राज्यघटना
स्वीकारली म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला
राज्यघटना दिली ज्यामुळे विविध भाषा, संस्कृतीने नटलेला भारत देश एकसंध राहीला
आहे. तूम्ही देशाच्या विविध भागातून प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी
होण्यासाठी आला.याठिकाणी आयोजित महीनाभराच्या शिबीरात चांगल्या गोष्टी शिकलात. विविध भागातून आलेल्या देश -विदेशातील
मित्रांशी तूमचा संवाद झाला. हा अनुभव तुम्हाला आयुष्याची शिदोरी ठरेल. ‘सर्वजन आपआपल्या
गावी जाताना स्वच्छता व देशप्रेमाचा संदेश आपल्या परिसरात विस्तार करा व देशसेवेचे
व्रत कायम पाळा’ असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या सुरूवातीस
पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली. मानवंदना
देण्या-या देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या चार दलातील निवडक कॅडेटसमधे महाराष्ट्रातील
९ कॅडेटसचा सहभाग होता. यावेळी पंतप्रधानांनी
मानवंदना देणा-या एनसीसी पथकाची पाहणी केली. यानंतर शिबीरात सहभागी प्रत्येक
राज्याच्या निवडक पथकांचे पथ संचलन झाले. ५० एनसीसी कॅडेटसचा सहभाग असणा-या
महाराष्ट्राच्या पथकाचे नेतृत्च महेश पांडव ने तर ध्वजवाहन देवयानी पागीरे ने
केले. बांग्लादेश, भुटान, कझाकीस्तान, नेपाळ, रशिया,श्रीलंका आणि व्हिएतनाम येथील
एनसीसी कॅडेटसनेही या पथसंचालनालयात भाग घेतला. यावेळी पथसंचलनात सहभागी
एनसीसीच्या लष्कर, वायूदल, नौदल, क्रीडा आणि स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणा-या
आकर्षक चित्र रथांना उपस्थितांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. दिल्ली एनसीसी
संचालनालयाच्या कॅडेटसनी यावेळी परॉसेलींगचे तर विविध संचालनालयाच्या ६०० कॅडेटसनी
योगासनांचे प्रात्याक्षीक सादर केले. पंतप्रधानांच्या हस्ते ‘पंतप्रधान बॅनर’ पुरस्कार वितरण करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित
केले. ‘हमसभ भारतीय है’ या
एनसीसीगीतानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
एनसीसी
महासंचालनालय आणि दिल्ली संचालनालयाच्यावतीने येथील गॅरीसन परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक
दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबिराचे आयोजन केले. १ जानेवारी पासून या
शिबिराला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबिराचे
उदघाटन झाले. तर पंतप्रधान रॅलीने आज या शिबिराची सांगता झाली. देशभरातील १७
एनसीसी संचालनालयाच्या २१०० कॅडेट्स यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील ११४
एनसीसी कॅडेटस या शिबिरात सहभागी झाले. यातील
२५ कॅडेटसची प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी तर 9 कॅडेटसची पंतप्रधान रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी निवड झाली.
या
शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ड्रिल
कॉम्पीटीशन, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा,
राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, पंतप्रधान रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत
महाराष्ट्रातील कॅडेटसनी उत्तम कामगिरी केली. गेल्या 25 वर्षांपैकी 17 वेळा पंतप्रधान
बॅनरचा बहुमान मिळवणा-या महाराष्ट्राला यावर्षी तिस-या क्रमांकावर समाधान मानावे
लागले.महाराष्ट्राच्या संघाचे प्रमुख कर्नल निखिल कुलकर्णी आणि उपप्रमुख मेजर
आर.आर.शिंदे हे आहेत .
००००००
No comments:
Post a Comment