नवी दिल्ली, 8: स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी ५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत प्रवेशिका
पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.
राज्य
शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय
निर्मितीसाठी स्व.यशवंतराव राज्य चव्हाण वाड:मय पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशन
वर्ष २०१५ च्या पुरस्कारासाठी लेखक,
प्रकाशकांना ५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१६ या कालावधी दरम्यान प्रवेशिका
मागवण्यात आल्या आहेत. दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत प्रकाशित
झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र असतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर नवीन संदेश व शीर्षाखालीही आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र परिच
केंद्रात या स्पर्धेच्या प्रवेशिका व नियमपुस्तिका विनामूल्य उपलब्ध आहेत.
दिल्लीस्थित
व महाराष्ट्राबाहेरील लेखक, प्रकाशक
पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका या कार्यालयास पाठवू शकतात. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळ, रवींद्र नाटयमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई
४०००२५ या पत्त्यावरही थेट प्रवेशिका पाठविता येतील. लेखक, प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर ‘स्व.यशवंतराव
चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०१५ साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित
कालमर्यादेनंतर येणा-या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत असे साहित्य आणि
संस्कृती मंडळाच्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट
करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment