नवी
दिल्ली, दि. 19 : मतदान
व्यवस्थापनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वीप’ कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या स्वीप कार्यक्रमाचे समन्वयक तथा उपमुख्य
निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा विशेष प्राविण्य
पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने २००९ पासून देशातील
विविध राज्यात ‘मतदारांना साक्षरकरून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी
करण्याचा कार्यक्रम’(‘स्वीप’)
राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या तिस-या टप्प्यात वर्ष २०१५ मधे
महाराष्ट्रात उत्तम प्रकारे अमंलबजावणी करण्यासाठी श्री. मोहोड हा पुरस्कार जाहीर
झाला. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते २५ जानेवारी रोजी येथील दिल्ली कॅण्टच्या मानेकशॉ सेंटर मधे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
‘स्वीप’
कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील व्यक्तींचा मतदान
प्रक्रियेत सहभाग वाढविण्यात शिरीष मोहोड यांनी उत्तम कामगिरी केली आहे. राज्यात
२०१४ मधे तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसायातील २०० व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीकृत
होते. वर्ष २०१५ मधे शिरीष मोहोड यांच्या प्रयत्नांनी ही संख्या पाचपटीने वाढून
१,०१८ झाली. श्री. मोहोड यांनी राज्यातील अशासकीय संस्थांच्या मदतीने तसेच तृतीय
पंथींयांसाठी कार्यकरणा-या श्रीमती लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या सहकार्याने हा
सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांच्या या उल्लेखनीय कामासाठी केंद्रीय निवडणूक
आयोगाचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राशिवाय बिहार, झारखंड, दिल्ली व
पश्चिम बंगालला विविध श्रेणींमधे पुरस्कार जाहीर झाले
No comments:
Post a Comment